रिअ‍ॅक्टरच्या स्फोटात दोघांचा मृत्यू

By admin | Published: October 9, 2014 04:59 AM2014-10-09T04:59:00+5:302014-10-09T04:59:00+5:30

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नं. टी १०८/९ मधील ‘जेपीएन फार्मा प्रा. लि.’ या कारखान्यात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला

Reactor blast killed both | रिअ‍ॅक्टरच्या स्फोटात दोघांचा मृत्यू

रिअ‍ॅक्टरच्या स्फोटात दोघांचा मृत्यू

Next

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नं. टी १०८/९ मधील ‘जेपीएन फार्मा प्रा. लि.’ या कारखान्यात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला. यात दोघे जागीच ठार झाले तर तिघे जखमी झाले. जखमींवर बोईसर येथील विकास हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
‘बल्क ड्रग्ज’ तयार करणाऱ्या जेपीएल फार्मामध्ये वरच्या मजल्यावरील एका रिअ‍ॅक्टरमध्ये पाण्याबरोबर एका प्रोडक्टचे डिस्टिलेशन सुरू होते; तेव्हा रिअ‍ॅक्टरमधील प्रेशर अचानक वाढून झालेल्या स्फोटात प्रवीण भांडीगरे (२६) हे सुपरवायझर तर राकेश बनकर (२२) या कामगाराचा जागीच मृत्यू झाल. भरत राऊत व सचिन भास्कर हे सुपरवायझर आणि मार्कंड सुना हा कामगार जखमी झाला. त्यांच्या हातपायांना, डोक्याला मार लागला आहे. तसेच चेहऱ्याला आगीच्या झळा बसल्या असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉ. रत्नाकर माने यांनी सांगितले. रिअ‍ॅक्टरच्या स्फोटामुळे कारखान्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि रस्त्यावर विखुरल्या होत्या.
अपघात झाल्यानंतर चौकशी करणे हा औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कामाचा भाग आहे. नियम काटेकोरपणे पाळले असते तर निश्चितच निष्पापांचा बळी गेला नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया कामगार व्यक्त करीत आहेत.

Web Title: Reactor blast killed both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.