बीबीसीच्या यादीत राहीबाई पोपेरेंचा समावेश; कोंभाळण्याची ‘सीड मदर’ जगाच्या पटलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 02:52 AM2018-11-24T02:52:27+5:302018-11-24T02:52:33+5:30

दुर्गम आदिवासी भागातील कोंभाळणे (ता.अकोले) येथील ‘सीड मदर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई सोमा पोपेरे यांचा बीबीसीच्या १०० प्रेरणादायी महिलांच्या जागतिक यादीत समावेश झाला आहे.

Rahibai Poparne included in BBC list; Chedding 'Seed Mother' on the Table of the World | बीबीसीच्या यादीत राहीबाई पोपेरेंचा समावेश; कोंभाळण्याची ‘सीड मदर’ जगाच्या पटलावर

बीबीसीच्या यादीत राहीबाई पोपेरेंचा समावेश; कोंभाळण्याची ‘सीड मदर’ जगाच्या पटलावर

googlenewsNext

अकोले (जि. अहमदनगर) : दुर्गम आदिवासी भागातील कोंभाळणे (ता.अकोले) येथील ‘सीड मदर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई सोमा पोपेरे यांचा बीबीसीच्या १०० प्रेरणादायी महिलांच्या जागतिक यादीत समावेश झाला आहे. त्यांनी आईच्या ममतेने दुर्मीळ पारंपरिक गावरान वाणांच्या बियाणांचे जतन करुन त्याची ‘बँक’ तयार केली आहे.
बीबीसीने विविध क्षेत्रात काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाºया जगातल्या १०० महिलांची ही यादी जाहीर केली. राहीबाईंनी आपल्या राहत्या घरात कोंडाळणेसारख्या छोट्या खेडेगावात पारंपरिक गावरान वाणांची बियाणे बँक ‘बायफ’ या सेवाभावी संस्थेच्या मदतीने सुरू केलेली आहे. या बँकेतून त्यांनी आतापर्यंत हजारो गरजू, होतकरु शेतकºयांना गावरान देशी वाणाचा पुरवठा केलेला आहे. त्यांच्याकडे सुमारे ५३ पिकांचे ११४ गावरान वाण शास्त्रशुध्द पध्दतीने जतन केलेले आहेत. गावरान बियाणे संवर्धन प्रचार व प्रसार यामध्ये केलेल्या भरीव कार्यासाठी यापूर्वी त्यांना कृषी विभागाने आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यापूर्वी ‘लोकमत’ समुहाने देखील राहिमावशी यांचा सन्मान केला आहे.
ज्यांनी आंतरिक ओढ, असमाधान आणि उद्वेगाच्या उद्रेकातून भोवतालच्या जगात मूलभूत बदल घडवले आहेत. वय वर्षे १५ ते ९४ वयोगटातील आणि ६० देशांतून बीबीसीने निवडलेल्या १०० महिलांमध्ये काही नेत्या आहेत. काही नवनिर्मात्या आहेत तर काही इतरांचे दैनंदिन आयुष्य सुरळीत सुरू राहावे, यासाठी झटणाºया सर्वसाधारण महिला आहेत.

नवप्रवर्तनाच्या निदर्शक असलेल्यांचा समावेश
दरवर्षी बीबीसी ही यादी प्रसिध्द करते. हे वर्ष ‘जागतिक स्त्री हक्क वर्षं’ म्हणून साजरे होत आहे. याचे औचित्त्य साधत ‘२०१८ बीबीसी हन्ड्रेड वुमेन’ च्या यादीत समाविष्ट झालेल्या १०० महिला नवप्रवर्तनाच्या निदर्शक आहेत. राहीबाई सोमा पोपेरे यांच्याही नावाचा आता समावेश झाला आहे.

Web Title: Rahibai Poparne included in BBC list; Chedding 'Seed Mother' on the Table of the World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.