नोटा बंदीमुळे रब्बीची पेरणी खोळंबली, दहा दिवसात १६ टक्केच पेरणी

By Admin | Published: November 17, 2016 08:16 PM2016-11-17T20:16:13+5:302016-11-17T20:16:13+5:30

ऐन रब्बी हंगामातील पेरणीच्यावेळी नोटा बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांकडे बियाणे, खते व विविध साहित्य खरेदी करण्यासाठी पैसेच नसल्यााने रब्बी हंगामातील पेरणीही प्रभावित झाली आहे

Rabi can be sown due to ban on currency, sowing of 16% in ten days | नोटा बंदीमुळे रब्बीची पेरणी खोळंबली, दहा दिवसात १६ टक्केच पेरणी

नोटा बंदीमुळे रब्बीची पेरणी खोळंबली, दहा दिवसात १६ टक्केच पेरणी

googlenewsNext

विवेक चांदूरकर
बुलडाणा, दि. 17 : ऐन रब्बी हंगामातील पेरणीच्यावेळी नोटा बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांकडे बियाणे, खते व विविध साहित्य खरेदी करण्यासाठी पैसेच नसल्यााने रब्बी हंगामातील पेरणीही प्रभावित झाली आहे. जिल्ह्यात ७ नोव्हेंबरपर्यंत ४० टक्के पेरण झाली होती. यामध्ये अधिक गती येणे आवश्यक असतानाच ५६ टक्के पेरणी झाली आहे.
 दहा दिवसांपूर्वी शासनाने ५०० व हजार रूपयांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे याचा परिणाम सर्वच स्तरावर पडला आहे. या निर्णयामुळे कृषि क्षेत्रातील बहुतांश व्यवहार ठप्प पडले आहेत. वऱ्हाडात दिवाळीनंतर रब्बी हंगामाला सुरूवात होते. नोव्हेंबर महिन्यात शेतकरी गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका यासह रब्बी पिकांची पेरणी करतात. 

८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी ५०० व हजार रूपयांच्या नोटा रद्द केल्या. तर बँकेतून केवळ चार हजार रूपयेच बदलून घेण्याची मुदत दिली. त्यामुळे शेतकऱ्यांकडे बियाणे, खत खरेदीसाठी तसेच मजूरांना पेरणीचे पैसे देण्यासाठी पैसेच नाहीत. परिणामी शेतकऱ्यांनी पेरणी पुढे ढकलली आहे. शासनाने नोटा बंदीचा निर्णय घेईपर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पेरणी झाली होती. त्यानंतर दहा दिवसात पेरणी मोठ्या प्रमाणात वाढणे अपेक्षित होते. मात्र, गत दहा दिवसात केवळ १६ टक्के पेरणी झाली. १६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात  ५६ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात एकूण रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३४३९५ हेक्टर आहे तर ७ नोव्हेंबरपर्यंत ४० टक्के म्हणजे ५४८०३ हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. तर दहा दिवसात यामध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली असून, एकूण 75299 हेक्टरवर पेरणी झाली आहे.


बाजार समिती बंदचा फटका
शेतकरी खरीप हंगामातील पिकांची विक्री करून त्यातून मिळालेल्या पैशातून रब्बीची पेरणी करण्याकरिता बियाणे व खत खरेदी करतात. मात्र, यावर्षी गत दहा दिवसांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील
सोयाबिनसह अन्य शेतमालाची विक्री केलीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामात पेरणी करण्याकरिता पैसेच नाहीत.

गत दहा दिवसांपासून बाजार समिती बंद आहे. तसेच बाजारपेठेत पैसेच नाहीत. बियाण्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. उधार देण्यास कुणी तयार नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी सध्या स्थगित ठेवली आहे. बँकेतून मुबलक पैसे मिळाल्यावर रब्बीच्या पेरणीला प्रारंभ करू.
- प्रदीप पवार
शेतकरी, अजिजपूर

Web Title: Rabi can be sown due to ban on currency, sowing of 16% in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.