रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने गर्भवतीच्या आई-वडिलांची धावपळ; धक्का देण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 01:57 AM2018-12-30T01:57:10+5:302018-12-30T01:59:12+5:30

तळेगावरोही उपकेंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने मुलीला प्रसुतीसाठी घेऊन जाणाऱ्या आई-वडिलांना रुग्णवाहिकेला धक्का देण्याची वेळ आली.

Pregnants parent run high due to ambulance malfunction | रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने गर्भवतीच्या आई-वडिलांची धावपळ; धक्का देण्याची वेळ

रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने गर्भवतीच्या आई-वडिलांची धावपळ; धक्का देण्याची वेळ

Next

- महेश गुजराथी

चांदवड : तळेगावरोही उपकेंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने मुलीला प्रसुतीसाठी घेऊन जाणाऱ्या आई-वडिलांना रुग्णवाहिकेला
धक्का देण्याची वेळ आली. रुग्णवाहिका सुरु न झाल्याने मालवाहतूक गाडीने महिलेला प्रसुतीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात न्यावे लागले.
सोनाली नवनाथ नन्नावरे (२२) यांना प्रसूती वेदना होऊ लागताच गुरुवारी रात्री सुमारास तळेगावरोही प्राथमिक केंद्रात दाखल केले. तिथे पहाटे चार वाजता जास्त वेदना होऊ लागल्याने त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला आरोग्य सहायकांनी दिला. मात्र रुग्णवाहिका ऐनवेळी नादुरुस्त झाल्याने सोनालीच्या आई-वडिलांवर रुग्णवाहिकेला धक्का द्यावा लागला. अखेर रुग्णवाहिका सुरू न झाल्याने नातेवाईकांच्या मदतीने मालवाहतूक गाडीने त्यांना चांदवड येथे दाखल करावे लागले. सोनाली यांची सकाळी प्रसूती होऊन त्यांनी गोंडस मुलीला जन्म दिला.

ही रु ग्णवाहिका नादुरु स्त असल्याचे आढळले आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावही जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला पाठविला आहे. - डॉ. पंकज ठाकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी

Web Title: Pregnants parent run high due to ambulance malfunction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.