भाजपाकडून सत्तेचा गैरवापर

By Admin | Published: February 3, 2016 03:56 AM2016-02-03T03:56:30+5:302016-02-03T03:56:30+5:30

माजी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सध्या सुरू असलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळांची पाठराखण केली

Power abuse by BJP | भाजपाकडून सत्तेचा गैरवापर

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर

googlenewsNext

मुंबई : माजी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सध्या सुरू असलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळांची पाठराखण केली. ‘महाराष्ट्रात आजवर असे कधी घडले नव्हते,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
माजी खासदार समीर भुजबळ यांना सक्तवसुुली संचालनालयाने सोमवारी रात्री अटक केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद सर्वत्र उमटले. नाशिक, बीड व मुंबई येथे समता परिषद व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या कारवाईविरुध्द उग्र आंदोलन केले. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तातडीने पत्रपरिषद घेऊन भुजबळांवरील कारवाई राजकीय हेतूने होत असल्याचा आरोप केला.
भाजपाचे खासदार आमच्या नेत्यांना जेलमध्ये पाठविणार असे म्हणत आहेत. आम्ही सगळे तयार आहोत, पण चौकशी यंत्रणेच्याही पुढचे बोलण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल पवार यांनी खा.किरीट सोमय्या यांचे नाव न घेता केला.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाबाबत जे काही निर्णय झाले ते तत्कालिन मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेले होते. ही उपसमिती मंत्रिमंडळाने नेमलेली असते. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने समिती नेमली जाते. उपसमितीचे निर्णय हे सरकारचे असतात आणि सरकारच्या निर्णयांची चौकशी होऊ शकत नाही, असा दावा पवार यांनी एका प्रश्नात केला. (विशेष प्रतिनिधी)

भुजबळप्रश्नी आंदोलन नाही
भुजबळांच्या समर्थनार्थ आपला पक्ष रस्त्यावर उतरणार का, असे विचारले असता, हा मुद्दा रस्त्यावरील आंदोलनाचा नाही. राज्यातील सामान्य माणसाशी संबंधित अनेक गंभीर विषय यापेक्षा आहेत, असे सांगत त्यांनी बगल दिली.

तो हात कोणाचा?
छगन भुजबळ यांच्या वॉटसअ‍ॅपवरील डीपीमध्ये पाठीत खंजीर खुपसला जात असल्याचा फोटो ठेवला आहे, याकडे लक्ष वेधले असता खंजीर खुपसणाऱ्याचा चेहरा दिसतो का, दिसत नसला तर खंजीर खुपसणारा हात असा किडकिडा आहे का, असा खोचक सवाल केला.

भेद करणाऱ्या देवावर विश्वास नाही
शनि शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना दर्शनासाठी परवानगी देण्याच्या मागणीचे पवार यांनी जोरदार समर्थन केले. ते म्हणाले की, पुरुष-महिला असा भेद मानणारा देव असेल तर माझ्या लेखी तो देवच नाही. सर्वांसाठी दर्शन खुले करण्याबाबत स्थानिक लोकांशी मी चर्चा केली आहे. आणखीही चर्चा करेल. मुख्यमंत्र्यांनीही सर्वांना दर्शनाची परवानगी असावी
सक्तवसुुली संचालनालयाने एकदा नाही, तर तीनवेळा छापे टाकणे, भाजपाच्या एका खासदाराने या कारवाईबाबतचे वेळोवेळी सूतोवाच करणे या घडामोडी बघितल्यानंतर भाजपा सत्तेचा गैरवापर करीत असल्याचे दिसते. कुणाच्या तरी इशाऱ्यावर भुजबळ कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. हे राजकीय द्वेषातून होत असल्याची शंका येते. चौकशी यंत्रणेवर दबाव आणण्याचे प्रयत्न होत आहेत.
- शरद पवार

Web Title: Power abuse by BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.