Opinion Poll: ...तर शिवसेनेला फक्त 2 जागा; काँग्रेस-राष्ट्रवादीला बंपर लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 09:28 PM2018-10-04T21:28:12+5:302018-10-04T21:29:09+5:30

शिवसेना स्वतंत्र लढल्यास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राहिल्यास पुढील लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी अतिशय रंजक असेल, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

Opinion Poll: ... only two seats in Shiv Sena; Bumper lotteries for Congress-NCP | Opinion Poll: ...तर शिवसेनेला फक्त 2 जागा; काँग्रेस-राष्ट्रवादीला बंपर लॉटरी

Opinion Poll: ...तर शिवसेनेला फक्त 2 जागा; काँग्रेस-राष्ट्रवादीला बंपर लॉटरी

googlenewsNext

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात स्वबळाचा नारा दिला. मात्र या एकला चलो रेचा मोठा फटका पक्षाला बसू शकतो. शिवसेना स्वतंत्र लढल्यास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राहिल्यास पुढील लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी अतिशय रंजक असेल, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीनं सध्या फडणवीस सरकार विरोधात रणशिंग फुंकलं आहे. तर शिवसेनेने स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास शिवसेनेला अवघ्या 2 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला 30 जागांवर यश मिळू शकतं. शिवसेना स्वतंत्र लढल्याचा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा थोडा फटका भाजपाला बसेल. त्यांना 16 जागांवर यश मिळू शकेल, अशी सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते.
2014 मध्ये मोदी लाटेचा तडाखा काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला होता. काँग्रेसचे अवघे 2 उमेदवार निवडून आले होते. तर राष्ट्रवादीला 4 जागांवर यश मिळालं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात दणदणीत यश मिळालं होतं. भाजपाला राज्यात 23 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपासोबत लढणाऱ्या शिवसेनेचे 18 उमेदवार निवडून आले होते.

Web Title: Opinion Poll: ... only two seats in Shiv Sena; Bumper lotteries for Congress-NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.