राज्यात उभारणार १२ आर्थिक कॉरिडोर, नितीन गडकरी यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 11:37 PM2017-10-25T23:37:02+5:302017-10-25T23:38:08+5:30

भारतमाला योजनेअंतर्गत देशात ४४ आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार असून त्यातील १२ कॉरिडोर महाराष्ट्रातून जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी...

 Nitin Gadkari's 12 financial corridors to be set up in the state | राज्यात उभारणार १२ आर्थिक कॉरिडोर, नितीन गडकरी यांची घोषणा

राज्यात उभारणार १२ आर्थिक कॉरिडोर, नितीन गडकरी यांची घोषणा

googlenewsNext

 नवी दिल्ली - भारतमाला योजनेअंतर्गत देशात ४४ आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार असून त्यातील १२ कॉरिडोर महाराष्ट्रातून जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील १६ जिल्ह्यांतून हे आर्थिक कॉरिडॉर जातील.
ते म्हणाले की, ४४ आर्थिक कॉरिडोरपैकी १२ आर्थिक कॉरिडोर महाराष्ट्रातून जाणार आहेत. त्यात मुंबई-कोलकाता (१,८५४ किमी), मुंबई-कन्याकुमारी (१,६१९किमी), आग्रा-मुंबई (९६४), पुणे-विजयवाडा (९0६ किमी), सुरत-नागपूर (५९३ किमी), सोलापूर-नागपूर (५६३ किमी), इंदूर-नागपूर (४६४ किमी), सोलापूर-बेल्लारी-गुट्टी (४३४ किमी), हैदराबाद-औरंगाबाद (४२७ किमी), नागपूर-मंडी दाबवली (३८७ किमी), सोलापूर-मेहबुबनगर (२९0 किमी) आणि पुणे-औरंगाबाद (२२२ किमी) यांचा समावेश असेल.
या सर्व आर्थिक कॉरिडोरची मिळून लांबी ८,५0१ किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रातून जाणाºया या आर्थिक कॉरिडोरमुळे ८ राज्यांशी महाराष्ट्र जोडला जाईल. या १२ आर्थिक कॉरिडोरमध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, जालना, नागपूर, रत्नागिरी, धुळे, पुणे, सोलापूर, जळगाव, लातूर, नांदेड, यवतमाळ व वर्धा या १६ जिल्ह्यांचा समावेश आहे.
 
तीन रिंग रोड
वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी देशातील २८ शहरांमध्ये रिंग रोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यात राज्यातील पुणे, नागपूर, धुळे या शहरांचा समावेश आहे.
 
९ मालवाहतूक तळ


देशात २४ मालवाहतूक तळ उभारण्यात येणार असून, त्यात महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, जेएनपीटी, मुंबई पोर्ट, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, नाशिक या ९ ठिकाणांचा समावेश करण्यात आल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

Web Title:  Nitin Gadkari's 12 financial corridors to be set up in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.