५०० वर्षांपूर्वीच्या तंत्राने मिळाले नवे नाक, नगरच्या तरुणीवर दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:55 AM2017-10-30T05:55:43+5:302017-10-30T05:55:48+5:30

युद्धात जायबंदी झालेल्या जवानांसाठी इटलीमध्ये ५०० वर्षांपूर्वी विकसित केलेल्या तंत्राने दुर्मीळ शस्त्रक्रिया करून येथील गोकूळदास तेजपाल (जीटी) इस्पितळातील डॉक्टरांनी १८ वर्षांच्या नगरच्या तरुणीला नवे नाक बसविले!

A new nose, a 500-year-old technique, has a rare operation on the girl's girl | ५०० वर्षांपूर्वीच्या तंत्राने मिळाले नवे नाक, नगरच्या तरुणीवर दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी

५०० वर्षांपूर्वीच्या तंत्राने मिळाले नवे नाक, नगरच्या तरुणीवर दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी

Next

मुंबई : युद्धात जायबंदी झालेल्या जवानांसाठी इटलीमध्ये ५०० वर्षांपूर्वी विकसित केलेल्या तंत्राने दुर्मीळ शस्त्रक्रिया करून येथील गोकूळदास तेजपाल (जीटी) इस्पितळातील डॉक्टरांनी १८ वर्षांच्या नगरच्या तरुणीला नवे नाक बसविले!
जन्मत:च एक नाकपुडी नसल्याने इतकी वर्षे चपटे नाक घेऊन लाजेने जगणाºया व श्वसनाचा त्रास सहन करणाºया कोमल डहाळे हिला या शस्त्रक्रियेमुळे नवे आयुष्यच मिळाले. लातूर व अहमदनगरमध्ये कोमलवर शस्त्रक्रिया करण्यासाठी कुटुंबीयांनी बरेच प्रयत्न केले.

‘टॅग्लिआकॉझी’ या शस्त्रक्रिया पद्धतीत एका हातातून रक्तवाहिन्यांसह एक त्वचेची नळी तयार केली जाते. ती नळीची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत जवळपास चार आठवडे लागतात. त्याच्याखाली आपल्या शरीरातील सपोर्टसाठी कुठल्या तरी भागाची थोडीशी चामडी लावली जाते.
त्यातून रक्तपुरवठा होत असतो. त्यानंतर या नळीच्या एका बाजूचा रक्तप्रवाह कमी केला जातो आणि ती नळी तीन आठवड्यानंतर नाकाला जोडली जाते.
शस्त्रक्रिया करुन नाकाच्या भागात मांसासह तिथे ती नळी फिक्स केली जाते. त्यानंतर त्या रुग्णाला त्याचा हात जवळपास तीन आठवडे तसाच ठेवावा लागतो. नाक तयार झाल्यानंतर त्वचेची नळी नाकापासून वेगळी केली जाते.
या संपूर्ण शस्त्रक्रियेला एकूण तीन महिने लागतात.

कोमलचे नाक अजून पूर्ण तयार झालेले नाही. जखमेचे टाके भरू लागले की, त्यावरील अतिरिक्त त्वचा काढून टाकण्यात येईल. जेणेकरून कोमलच्या चेहºयाप्रमाणे नाकाचा आकार ठरविता येईल.
- डॉ. नितीन मोकल,
विभागप्रमुख प्लास्टिक सर्जरी,
जीटी रुग्णालय

Web Title: A new nose, a 500-year-old technique, has a rare operation on the girl's girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.