तरुणाच्या मृत्यू प्रकरणात नायर रुग्णालयातील डॉक्टर, वॉर्डबॉय, महिला कर्मचा-याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 05:00 PM2018-01-28T17:00:22+5:302018-01-28T21:36:30+5:30

नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एमआरआय रुममध्ये तरुणाच्या झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी तीन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Nayar hospital doctor, Wardboy, women employee-in-law's crime case, in connection with the death of the youth | तरुणाच्या मृत्यू प्रकरणात नायर रुग्णालयातील डॉक्टर, वॉर्डबॉय, महिला कर्मचा-याला अटक

तरुणाच्या मृत्यू प्रकरणात नायर रुग्णालयातील डॉक्टर, वॉर्डबॉय, महिला कर्मचा-याला अटक

Next

मुंबई- नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एमआरआय रुममध्ये तरुणाच्या झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी तीन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच डॉक्टर, वॉर्डबॉय, महिला कर्मचा-यांवर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. डॉ. सिद्धांत शहा, वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण, महिला कर्मचारी सुनीता सुर्वे यांचं निलंबन करत त्यांच्यावर भादंवि 304 गुन्ह्यांतर्गत अटकही करण्यात आली आहे. 

या प्रकरणात राज्य सरकारानं मृताच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत देऊ केली आहे. या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तरुणाच्या मृत्यूनंतर भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांनी नायर रुग्णालयाचे डीन यांना धारेवर धरले असून, त्यांच्याच कार्यालयात बसून निषेध आंदोलन केलं होतं. अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव राजेश मारूची असून, आजारी असलेल्या आईला त्यानं एमआरआय चाचणीसाठी नेले असताना ही दुर्घटना घडली आहे. एमआरआय चाचणीसाठी आईला नेत असताना रूमबाहेर असलेल्या वॉर्डबॉयने राजेशच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि घड्याळ सुरक्षिततेच्या दृष्टीनं काढून ठेवण्यास सांगितले. परंतु त्याच वेळी वॉर्डबॉयनं रुग्णासाठीचा ऑक्सिजन सिलिंडर राजेशला आत नेण्यास सांगितलं.



राजेशनं त्याला विरोध केला असता, वॉर्डबॉयने एमआरआय मशीन बंद असल्याचं सांगितलं होतं. त्याच दरम्यान राजेश रुममध्ये गेला आणि एमआरआय मशिनने तात्काळ सिलिंडरसकट राजेशला ओडून घेतले. सिलिंडरला पकडून राजेशही या मशिनमध्ये अडकला गेला. त्यानंतर सिलिंडरचे झाकण एमआरआय मशीनमध्ये उघडले गेले आणि त्यातील वायू हा राजेशच्या पोटात गेला. वॉर्डबॉयनं अथक प्रयत्न करून राजेशला बाहेर काढले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


 

Web Title: Nayar hospital doctor, Wardboy, women employee-in-law's crime case, in connection with the death of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.