बनावट नोटांद्वारे अर्थव्यवस्था खिळखिळी करणाऱ्या दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:31 PM2018-07-07T22:31:37+5:302018-07-07T22:41:58+5:30

नाशिक : बनावट नोटा तयार करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणा-या दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़ ७) जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ ज्ञानेश्वर सीताराम पाटील (३७, भोर टाउनशिप अंबड-लिंक रोड, सातपूर) व जावेद अब्दुल कादीर मनियार (४४, रा़ हरीष रेसिडेन्सी, साईनाथनगर) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत़ दरम्यान, अर्थव्यवस्थेला धक्का देणाºया बनावट नोटांप्रकरणी गंभीर शिक्षा होण्याचा राज्यातील हा पहिलाच निकाल असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली आहे़

nashik,fake,currency,two,accused,court,conviction | बनावट नोटांद्वारे अर्थव्यवस्था खिळखिळी करणाऱ्या दोघांना जन्मठेप

बनावट नोटांद्वारे अर्थव्यवस्था खिळखिळी करणाऱ्या दोघांना जन्मठेप

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यातील पहिलाच निकाल : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयघरातच छापखाना ; शंभरची नोट पन्नासला

नाशिक : बनावट नोटा तयार करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणा-या दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़ ७) जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ ज्ञानेश्वर सीताराम पाटील (३७, भोर टाउनशिप अंबड-लिंक रोड, सातपूर) व जावेद अब्दुल कादीर मनियार (४४, रा़ हरीष रेसिडेन्सी, साईनाथनगर) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत़ दरम्यान, अर्थव्यवस्थेला धक्का देणाºया बनावट नोटांप्रकरणी गंभीर शिक्षा होण्याचा राज्यातील हा पहिलाच निकाल असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली आहे़

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील साती आसरा मंदिराजवळ १०० रुपये दराच्या चार लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करून विक्रीसाठी आलेले आरोपी पाटील व मनियार या दोघांना शहर गुन्हे शाखेने १० आॅक्टोबर २०१४ रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास बनावट गिºहाईक पाठवून अटक केली होती़ त्यांच्याविरोधात पोलीस हवालदार जाकीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्यातील तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व पथकाने बनावट नोटा तयार करीत असलेल्या ठिकाणी छापा टाकून कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर, हार्डडिस्क, नोटा तयार करण्यासाठी लागणारा पेपर, कटर मशीन यासह वीस हजार रुपयांच्या शंभर रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या़

न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील शिरीष कडवे व विद्या जाधव यांनी अकरा साक्षीदार तपासले़ त्यामध्ये कलीना येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेने दिलेला तपासणी अहवाल, नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेसचे उपव्यवस्थापक शेखरकुमार घोष यांनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली़ न्यायाधीश शिंदे यांनी या आपल्या ५५ पानी निकालात या दोघांनाही भारतीय दंडविधान कलम ४८९ (अ,ब,क,ड,ई) अन्वये दोषी ठरवून जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़ इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी एल़यू़ शेख, पोलीस नाईक संतोष गोसावी, कोर्ट कर्मचारी एस़बी़ गोडसे यांनी पाठपुरावा केला़


शंभर रुपयांची नोट पन्नासला
इंदिरानगरच्या सातीआसरा मंदिराजवळ आरोपी पाटील व मनियार यांनी १०० रुपयांच्या बनावट नोटांचे ४२ बंडल (४ लाख २० हजार रुपये) हे विक्रीसाठी आणले होते़ शंभर रुपयांची बनावट नोट पन्नास रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट गिºहाईक पाठवून या दोघांना सापळा लावून पकडले होते़


आर्थिक गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षेचे आदेश


आर्थिक गुन्ह्यांसंबंधी कठोर शिक्षा देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत़ बनावट नोटांमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी होत असून, आरोपींकडे शंभर रुपये दराच्या चार लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच नोटा तयार करीत असलेल्या ठिकाणी वीस हजार असे चार लाख चाळीस हजार रुपये पोलिसांनी जप्त केले़ कलीना येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा नोटा तपासणी अहवाल, पंचांच्या साक्षीवरून आरोपी अनेक दिवसांपासून बनावट नोटा तयार करीत असल्याचे सिद्ध झाले़ अर्थव्यवस्थेला धोका पोहोचविणाºया अशा आरोपींना दया दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, त्यामुळे त्यांना कठोर शिक्षाच योग्य आहे़
- सूर्यकांत शिंदे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक़

Web Title: nashik,fake,currency,two,accused,court,conviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.