अपघातात नाशिकचे चौघे ठार : दोघे गंभीर

By admin | Published: July 16, 2017 10:53 PM2017-07-16T22:53:13+5:302017-07-16T23:03:26+5:30

नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या इनोव्हा मोटारीला भिवंडीजवळ महामार्गावर रविवारी (दि.१६) सकाळी अपघात झाला.

Nashik: Four people were killed in an accident, both of them seriously | अपघातात नाशिकचे चौघे ठार : दोघे गंभीर

अपघातात नाशिकचे चौघे ठार : दोघे गंभीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या इनोव्हा मोटारीला भिवंडीजवळ महामार्गावर रविवारी (दि.१६) सकाळी अपघात झाला. इनोव्हाचे टायर फुटल्याने मोटार दुभाजकावर जाऊन आदळून समोरील रस्त्यावर उलटली. या भीषण अपघातात जुने नाशिकमधील हुड्डा कु टुंबातील दोघा महिलांसह लाखानी कुटुंबातील दाम्पत्यासह चौघांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत भिवंडी तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकवरून मुंबईकडे निघालेले हुड्डा कुटुंबीयांच्या इनोव्हा (एम.एच.१५बीयू ९९४) मोटारीचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार दुभाजकावर आदळून मुंबई-नाशिक लेनवरून जाणाऱ्या ट्रकच्या समोर उलटली. ट्रकचालकाच्या सदर प्रकार वेळीच लक्षात आल्यानंतर त्याने तत्काळ ब्रेक लावले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातामध्ये जुने नाशिकमधील वडाळानाका येथे राहणाऱ्या हुड्डा कुटुंबातील दोन महिलांचा मृतांत समावेश आहे. यामध्ये परवीन नसरुद्दीन हुड्डा (५६), आफसिन मोहिद हुड्डा (२५), गुलशन बहादूर लाखानी (५३, शिंगाडा तलाव), बहादूर मुसाभाई लाखानी (५५, शिंगाडा तलाव) असे मयतांची नावे आहेत. तसेच मोटारचालक मोहिद नसरुद्दीन हुड्डा व नसरुद्दीन सदरुद्दीन हुड्डा हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भिवंडीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Web Title: Nashik: Four people were killed in an accident, both of them seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.