महाराष्ट्राचे कमाल तापमान ३९ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 06:17 AM2019-03-14T06:17:24+5:302019-03-14T06:17:32+5:30

राजकीय वातावरणाचा पारा चढत असतानाच राज्यातील शहरांच्या कमाल तापमानाचा पाराही वाढत आहे.

Maximum temperature in Maharashtra is 39 degrees Celsius | महाराष्ट्राचे कमाल तापमान ३९ अंशांवर

महाराष्ट्राचे कमाल तापमान ३९ अंशांवर

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीची धामधूम देशभरात सर्वत्र सुरू असतानाच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय वातावरणाचा पारा चढत असतानाच राज्यातील शहरांच्या कमाल तापमानाचा पाराही वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे बुधवारी तब्बल सात शहरांचे कमाल तापमान ३९ अंश व त्याहून अधिक नोंदविण्यात आले.

समुद्र जवळ असलेल्या मुंबईचे कमाल तापमान मात्र ३० अंशावर स्थिर आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश गुरुवारसह शुक्रवारी मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, २१ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

१४ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
१५ मार्च रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
१६ मार्च रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
१७ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

राज्यातील शहरांचे बुधवारचे कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये.
अकोला ३९, अमरावती ३९, औरंगाबाद ३५.२, बीड ३८, चंद्रपूर ३९.४, गोंदिया ३५.६, जळगाव ३५.२, जेऊर ३७, कोल्हापूर ३६, मालेगाव ३७.२, मुंबई ३०.६, नागपूर ३८.५, नांदेड ३९.५, परभणी ३९.४, पुणे ३५.६, सांगली ३७, सातारा ३६.३, सोलापूर ३८.९, वर्धा ३९, यवतमाळ ३९.

Web Title: Maximum temperature in Maharashtra is 39 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.