कारखानदार आणि राजू शेट्टींनी व्यवहार्य मार्ग काढावा : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 01:54 PM2018-11-09T13:54:47+5:302018-11-09T15:36:25+5:30

साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम दिलीच पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. मात्र आता शेतकरीही एकदा ऊस लौकर जावा या मानसिकतेत आहे. त्यामुळे कारखानदार आणि राजू शेट्टी यांनी एकत्र बसून व्यवहार्य तोडगा काढावा असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले.

Manufacturer and Raju Shetty should make a practical way: Chandrakant Patil | कारखानदार आणि राजू शेट्टींनी व्यवहार्य मार्ग काढावा : चंद्रकांत पाटील

कारखानदार आणि राजू शेट्टींनी व्यवहार्य मार्ग काढावा : चंद्रकांत पाटील

Next
ठळक मुद्देकारखानदार आणि राजू शेट्टींनी व्यवहार्य मार्ग काढावा : चंद्रकांत पाटीलपाच राज्यांच्या निकालानंतर युतीबाबत निर्णयशहरांचे नामकरण व्हावे ही आमचीही इच्छा

कोल्हापूर : साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम दिलीच पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. मात्र आता शेतकरीही एकदा ऊस लौकर जावा या मानसिकतेत आहे. त्यामुळे कारखानदार आणि राजू शेट्टी यांनी एकत्र बसून व्यवहार्य तोडगा काढावा असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले.

निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकूणच मागील युती काळापासून साखर उद्योगासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. आंदोलनामध्ये जर कायदा हातात घेतला गेला तर प्रशासन गप्प बसणार नाही. कडक कारवाई करू असे ते म्हणाले.


पाटील म्हणाले, पाच राज्यांच्या निकालानंतर भाजप शिवसेना युतीबाबत पुढची पावले पडतील. उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर व्हावे ही आमचीही भूमिका आहे.त्याची प्रक्रिया पाहून निर्णय घेतला जाईल.

 

Web Title: Manufacturer and Raju Shetty should make a practical way: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.