महाराष्ट्रात साखरेचे भाव शरद पवार यांनीच पाडले

By admin | Published: November 20, 2014 11:37 AM2014-11-20T11:37:40+5:302014-11-20T11:41:37+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील काळे, कोल्हेंसह सगळे कारखानदार काटामार, उताराचोर आहेत, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे केला.

In Maharashtra, Sharad Pawar made the sugar price | महाराष्ट्रात साखरेचे भाव शरद पवार यांनीच पाडले

महाराष्ट्रात साखरेचे भाव शरद पवार यांनीच पाडले

Next

 महाराष्ट्रात साखरेचे भाव शरद पवार यांनीच पाडले

 
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील काळे, कोल्हेंसह सगळे कारखानदार काटामार, उताराचोर आहेत, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे केला.
संघटनेच्या वतीने आयोजित ऊस व दूध परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूरच्या साखर कारखान्यांचा जादा उतारा निघत असताना अहमदनगर जिल्ह्याचा साखर उतारा १२ टक्क्यांपेक्षा कमी कसा? असा सवाल करून ते म्हणाले, या जिल्ह्यातील सर्वच कारखानदार उतारा चोरतात, काटा मारतात. यात काळे, कोल्हेंसह सगळेच सामील आहेत. १ टक्के उतारा चोरणे म्हणजे १0 किलो साखर चोरणे. त्यामुळे टनामागे २७0 रूपये चोरी करुन ते कारखानदारांच्या घरात जातात.
सरकारचा कर बुडवला जातो. सरकार व शेतकर्‍यांची फसवणूक करुन बिनशिक्क्यांचे पोते बाजारात विकून तो पैसा निवडणुकीत वापरला जातो. एकाच काट्यावर साखर, ऊस व रिकाम्या तसेच भरलेल्या ट्रकचे वजन होत नाही, हेच यामागचे इंगित आहे. ही चोरी थांबविण्यासाठी आपल्या प्रयत्नातून देशभरात खासदार निधीतून सहकारी साखर कारखान्यांसमोर इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे बसविण्यास सुरुवात झाली आहे. आता आमचे सरकार आल्यामुळे आमदार निधीही यासाठी देण्याची मागणी आहे. जो आमदार त्यासाठी निधी देणार नाही, तो काटामारांना सामील असल्याचे समजण्यात येईल. नगर जिल्ह्यातील उतारा चोरी थांबल्यास १२.५0 टक्क्यांपेक्षा जास्त उतारा मिळून शेतकर्‍यांनाही जादा भाव मिळेल. 
यंदाच्या हंगामासाठी १५ दिवसात विनाकपात पहिली उचल २७00 रूपये प्रतिटन मिळाली पाहिजे. ही आमची मागणी नियमाप्रमाणे आहे. या मागणीसाठी २५ नोव्हेंबरला पुण्यातील साखर आयुक्तालयावर शेतकर्‍यांचा आसूड मोर्चा नेला जाणार आहे. पूर्वीचे सरकार ऐकत नव्हते.
आताचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला हा मोर्चा काढावा लागणार नसल्याचे सांगून चर्चेसाठी लगेचच हात पुढे केला आहे. राज्यात २0 टक्के दूध भेसळ करणारे राजकारणी आहेत. त्यांच्या मुसक्या बांधल्यास शेतकर्‍याच्या दुधाला योग्य भाव मिळेल. शरद पवारांनी अलिबागच्या शिबिरात माझ्या दूध संस्थेचा विषय काढला. माझ्या संस्थेचे दररोज ७0 हजार लीटर संकलन असून प्रति लीटर २३.५0 रूपये दर देत आहे. पवारांनी सहकारी साखर कारखान्यांचा परवाना मिळणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवली आहे, अन्यथा त्यांना कारखानाही काढून दाखवला असता', असे आव्हानही त्यांनी पवारांनादिले. 
चंद्रकांत उंडे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी प्रास्ताविक केले. माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, प्रकाश देठे, प्रभावती घोगरे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांची भाषणे झाली. माजी आमदार दौलतराव पवार, हेरंब औटी, गुलाबराव डेरे आदी यावेळी हजर होते. (प्रतिनिधी) 
 
■ राज्यातील कारखानदारांनी एम.आर. पी. पेक्षा कमी भाव दिल्यास त्यांना बेड्या घालू. शेतकर्‍यांचे प्रश्न हे सरकार सोडवणार नसेल, तर त्यांनाही माफ करणार नाही. प्रसंगी ५ वर्षे रस्त्यावर राहू. ऊसप्रश्नी सरकारला २५ पर्यंत मुदत दिली आहे. साखरेच्या सट्टाबाजारांशी शरद पवारांचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनीच मुद्दाम साखरेचे भाव पाडले. आता उसाला भाव मिळत नाही म्हणून भाजपा सरकारला बदनाम करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. 
- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना. भाव पवारांनीच पाडले

Web Title: In Maharashtra, Sharad Pawar made the sugar price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.