UPSCच्या परीक्षेत महाराष्ट्राची बाजी : पुण्याची तृप्ती धोडमिसे देशात १६ वी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 09:23 PM2019-04-05T21:23:12+5:302019-04-05T21:24:42+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) शुक्रवारी रात्री निकाल जाहीर झाला, त्यामध्ये पुण्याची तृप्ती धोडमिसे ही देशात १६ वी आली आहे. देशातून कनिष्क कटारिया हा पहिला आहे तर सृष्टी देशमुख ही महिलांमधून पहिली तर देशात ५ वी आली आहे.

Maharashtra rock in UPSC exam results rock: Trupti Dhodimese in Pune, 16th in the country | UPSCच्या परीक्षेत महाराष्ट्राची बाजी : पुण्याची तृप्ती धोडमिसे देशात १६ वी

UPSCच्या परीक्षेत महाराष्ट्राची बाजी : पुण्याची तृप्ती धोडमिसे देशात १६ वी

googlenewsNext

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) शुक्रवारी रात्री निकाल जाहीर झाला, त्यामध्ये पुण्याची तृप्ती धोडमिसे ही देशात १६ वी आली आहे. देशातून कनिष्क कटारिया हा पहिला आहे तर सृष्टी देशमुख ही महिलांमधून पहिली तर देशात ५ वी आली आहे.

पुण्याच्या तृप्ती दोडमिसे यांनी दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण झाल्या आहेत. तिचे आई वडील शिक्षक आहेत. ती १० वी आणि १२ वी या दोनही वर्षी बोर्डात अनुक्रमाने १० व्या आणि ११व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्यानंतर २०१० साली त्यांनी पुण्याच्या कॉलेज  इंजिनिअरिंग (सीओईपी) प्रोडक्शनची पदवी घेतली. सध्या त्या सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. लग्नानंतरही त्यांनी युपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला होता. संसार, नोकरी, घर आदी सगळे सांभाळून त्यांनी युपीएससीमध्ये १६ वा क्रमांक पटकाविला आहे. 

युपीएससीची परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर २०१८ मध्ये पार पडली होती, त्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये मुलाखती पार पाडल्या. युपीएससीच्या परीक्षेत एकूण ७५९ विद्यार्थी यशस्वी झाले असून त्यापैकी १८० जणांनी आयएएस, ३० जणांनी आयएसएस, १५० जणांनी आयपीएस रँक मिळवली आहे. ग्रुप ए मधून ३८४, ग्रुप बी मधून ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या आयएफएस

परराष्ट्र सेवेतून निवृत्त होऊन तीन महिने उलटत असताना त्यांची कन्या पुजा हिने देशभरातून ११ वा रँक पटकावून आयएफएस रँक मिळवली आहे. विशेष म्हणजे तिच्या वाढदिवसाची दिवशी तिला ही अत्यंत आनंदाची बातमी समजली आहे. 

चिकाटी अन् जिदद् सोडू नका

लोकमतशी बोलताना तृप्ती म्हणाली, ‘‘यशाचा आनंद तर खूप आहे. पण त्यात मी एकटी नाही तर माझ्या सासर आणि माहेरच्या मंडळींचा आणि विशेषत: नवरा सुधाकर यांचा मोठा वाटा  आहे. त्यांच्या पाठिंब्यावर मी इथंपर्यंत पोचू शकले. मी निराश होऊन अभ्यास सोडणाऱ्या  मुलांना एवढंच सांगेन की,तुम्ही चिकाटी आणि जिद्द सोडू नका, स्वप्न आपोआप तुमचा पाठलाग करत भेटायला येतील.’’

Web Title: Maharashtra rock in UPSC exam results rock: Trupti Dhodimese in Pune, 16th in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.