हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका; बाळासाहेबांचा उल्लेख करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 03:49 PM2024-01-21T15:49:15+5:302024-01-21T15:51:20+5:30

Shiv Sena UBT: 'शिवसेना नेत्यांवर शिंदे गटात सामील होण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा दबाव आहे.'

Maharashtra Politics: Aditya Thackeray criticizes BJP on Hindutva issue; Mentioning Balasaheb and said... | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका; बाळासाहेबांचा उल्लेख करत म्हणाले...

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका; बाळासाहेबांचा उल्लेख करत म्हणाले...

Aaditya Thackeray on BJP :हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना(उबाठा गट) आणि भाजप(BJP) मध्ये नेहमी खटके उडत असतात. अशातच, शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पुन्हा एकदा हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी त्यांचे आजोबा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण करुन दिली. 

मुंबईत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेने आमदार अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा चुकीचा आदेश लोकांसमोर आणण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, त्यामुळे शिवसेनेच्या सहकाऱ्यांना सातत्याने तपास यंत्रणांकडून लक्ष्य केले जात आहे. रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर, राजन साळवी यांना शिंदे गटात सामील होण्यासाठी तपास यंत्रणांकडून त्रास आणि धमक्या दिल्या जाताहेत. या नेत्यांकडे लपवण्यासारखे काहीच नाही, म्हणूनच ते उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहतात.

यावेली त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांसाठी देशद्रोही शब्द वापरला. ते म्हणाले, लोकसभा, विधानसभा किंवा इतर कुठल्याही निवडणुकांमध्ये एकही "देशद्रोही" विजयी होणार नाही याची काळजी घ्या. आदित्य ठाकरे म्हणाले, जेव्हा माझे विरोधक मला टार्गेट करतात, तेव्हा मला फार उत्साह येतो. कारण, मला माहितेय की, माझ्या टीकेचा त्यांना फटका बसला आहे आणि मी योग्य मार्गावर आहे. माझे आजोबा शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही राजकारण, भ्रष्टाचार किंवा पक्ष फोडण्यासाठी हिंदुत्वाचा वापर केला नाही, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Web Title: Maharashtra Politics: Aditya Thackeray criticizes BJP on Hindutva issue; Mentioning Balasaheb and said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.