ठाकरे सरकारला इशारा; "बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास आंदोलन करणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 05:07 PM2020-07-30T17:07:25+5:302020-07-30T17:14:50+5:30

"सरकारने बकरी ईद निमित्त कुर्बानी देणे अवघड केले आहे. एवढेच नाही, तर बकरांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत"

Maharashtra government hurdles in sacrifice for bakrid Muslims warned agitation. | ठाकरे सरकारला इशारा; "बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास आंदोलन करणार"

ठाकरे सरकारला इशारा; "बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास आंदोलन करणार"

googlenewsNext
ठळक मुद्देसीमेवर अडवली जातायत प्राणी घेऊन येणारी वाहने'सरकारने मुस्लीम नेत्यांचेही ऐकले नाही''इस्लाममध्ये प्रतीकात्मक कुर्बानीची संकल्पना नाही'

मुंबई - महाविकास अघाडी सरकारने आमचा अपेक्षा भंग केला आहे. बकरी ईद निमित्त पशूंची कुर्बानी देण्यात सरकार अडथळे आणत आहे. हे थांबले नाही, तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा मुंबईतील मुस्लीम कार्यकर्ते आणि काही मौलानांनी दिला आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर मौलानांनी निशाणा साधला आहे. "सरकारने बकरी ईद निमित्त कुर्बानी देणे अवघड केले आहे. एवढेच नाही, तर बकरांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत," असे मोलानांनी म्हटले आहे.

सीमेवर अडवली जातायत प्राणी घेऊन येणारी वाहने - 
संबंधित मोलानांनी आपोर केला आहे, की दुसऱ्या राज्यांतून बकरे घेऊन येणारी वाहने सीमेवर अडवले जात आहेत. त्यांना चेकपोस्टवरून आत येण्यापासून रोखले जात आहे. पोलीस एका वेळी केवळ दोनच बकरे नेण्यास परवानगी देत आहेत. यामुळे संबंधित लोकांना नाहक त्रास होत आहेत.

'सरकारने मुस्लीम नेत्यांचेही ऐकले नाही' -
ऑल इंडिया उलेमा काउंसिलचे मौलाना मसूद दरयाबादी म्हणाले, 'आम्हाला आमचे मुस्लीम आमदार आणि मंत्र्यांवर विश्वास होता. आम्हाला आशा होती, की ते सरकारला सुधारित नियमावली जारी करायला सांगतील. त्यांनी बरेच प्रयत्न केले. एवढेच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही यात हस्तक्षेप केला. मात्र तरीही त्याचा उपयोग झाला नाही.'

'इस्लाममध्ये प्रतीकात्मक कुर्बानीची संकल्पना नाही' -
हांडीवाली मशिदीचे इमाम मौलाना ऐजाज कश्मीर यांनी म्हटले आहे, की पोलिसांनी जेथे वाहने अडवली, तेथे त्यांचे मुस्लीम सहकारी गेलेदेखील, मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. माजी मंत्री नसीम खान म्हणाले, इस्लाममध्ये प्रतीकात्मक कुर्बानीची संकल्पना नाही. ऑनलाइन बकरे विकत घेण्यातही अडचणी येत आहेत. 

'देवनारच्या कत्तलखान्यात रोज म्हशी कापल्या जातात. पण कुर्बानीसाठी म्हशी कापण्यास परवानगी नाही. हा कुठला नियम आहे, असा सवाल अमन कमिटीचे प्रमुख फरीद शेख यांनी केला. 'यापूर्वीचे फडणवीस सरकार प्रत्येक सणापूर्वी मुस्लिम एनजीओ, मौलाना आणि आमदारांची बैठक घ्यायचे. ठाकरे सरकारने, अशी कुठलीही बैठक घेतलेली नाही,' असेही शेख म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या -

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करून शकतं राफेल

सुस्साट वेग, खतरनाक रेंज अन् 70 लाखांचं क्षेपणास्त्र, जाणून घ्या राफेल का आहे 'ब्रह्मास्त्र'

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी

Web Title: Maharashtra government hurdles in sacrifice for bakrid Muslims warned agitation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.