राज्य मंत्रिमंडळातील 8 जणांना नारळ मिळणार; 13 आमदारांचा शपथविधी होणार

By अतुल कुलकर्णी | Published: June 16, 2019 05:59 AM2019-06-16T05:59:19+5:302019-06-16T06:06:52+5:30

भाजपाचे 10, शिवसेनेचे 2 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ

Maharashtra Cabinet expansion 13 mlas will sworn in as minister 8 ministers will lose their post | राज्य मंत्रिमंडळातील 8 जणांना नारळ मिळणार; 13 आमदारांचा शपथविधी होणार

राज्य मंत्रिमंडळातील 8 जणांना नारळ मिळणार; 13 आमदारांचा शपथविधी होणार

Next

- अतुल कुलकर्णी

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. या फेरबदलात आठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. आज एकूण 13 जणांचा शपथविधी संपन्न होईल. यामध्ये विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचादेखील समावेश आहे. सोमवारपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरू होत आहे.

सध्या मंत्रिमंडळात 22 कॅबिनेट आणि 16 राज्यमंत्री आहेत. तर पाच रिकाम्या जागा भरणं शक्य आहे. विद्यमान मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांना डच्चू देणात येणार असल्यानं एकूण 13 जण मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, अनिल बोंडे, अतुल सावे, संजय भेगडे, संजय कुटे, सुरेश खाडे, अशोक उइके, परिणय फुके, योगेश सागर या भाजपा नेत्यांसह शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत यांचा समावेश आहे. तर रिपाईंचे अविनाश महातेकरदेखील मंत्रिपदाची शपथ घेतील. 

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील आठ जणांचं मंत्रिपद जाणार आहे. यामध्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अमरिश आत्राम यांच्यासह आणखी दोघांना नारळ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी दिल्लीत जातील व मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब करतील, रविवारी विस्तार होईल, हे वृत्त ‘लोकमत’नं दिले होतं. मुख्यमंत्री शुक्रवारी रात्री अचानक उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीला गेले. तेथून बाहेर पडताच त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याचे ट्विट केले होते.
 

Web Title: Maharashtra Cabinet expansion 13 mlas will sworn in as minister 8 ministers will lose their post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.