मटणासाठी पत्नीचा खून करणा:याला जन्मठेप

By Admin | Published: August 8, 2014 01:44 AM2014-08-08T01:44:59+5:302014-08-08T01:44:59+5:30

वडील मधुकर खुटाडे यांनीच आई मनीषा (35) हिचा कु:हाडीने खून केला आहे, अशी साक्ष मुलगी सीमा जाधव हिने दिल्यानंतर मधुकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Life imprisonment for killing wife for murder: | मटणासाठी पत्नीचा खून करणा:याला जन्मठेप

मटणासाठी पत्नीचा खून करणा:याला जन्मठेप

googlenewsNext
>ठाणो : वडील मधुकर खुटाडे यांनीच आई मनीषा (35) हिचा कु:हाडीने खून केला आहे, अशी महत्त्वपूर्ण साक्ष विवाहित मुलगी सीमा जाधव (22) हिने दिल्यानंतर मधुकरला ठाणो जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश  एम.सी. खडके यांनी बुधवारी ही शिक्षा सुनावली.
अंगावर शहारे आणणारी ही घटना भिवंडीच्या दुगाडजवळील पालखणो येथील आदिवासी कुटुंबात दोन वर्षापूर्वी म्हणजे 6 ऑगस्ट 2क्12 रोजी घडली होती. आरोपी मधुकर याने आणलेले मटण शिजवून देण्याचे मनीषाला फर्मावले होते. तिने त्यास नकार देतानाच पतीला शिवीगाळ केली. यातून संतापलेल्या मधुकरने तिच्यावर कु:हाडीने वार केले. हे वार होत असताना विव्हळणा:या आईचा आवाज ऐकून बाजूलाच वास्तव्यास असलेली तिची मुलगी सीमा तिथे आली. 
अनेक वार झाल्यामुळे रक्तस्नव होऊन मनीषाचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहिती गणोशपुरीचे उपअधीक्षक o्रीनिवास घाटगे यांनी न्यायालयाला दिली.
या खटल्यात आरोपीची मुलगी सीमा हिची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. जावई पिंटय़ा जाधव यांनी मात्र ऐनवेळी त्यांची साक्ष फिरवली. आईवडिलांच्या घराशेजारीच वास्तव्याला असल्यामुळे त्या दिवशी दुपारी आईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकल्यानंतर धावतच आले. त्या वेळी वडील मधुकर तिच्यावर  कु:हाडीने घाव घालत असल्याचे दृश्य पाहिले, अशी साक्ष सीमाने नोंदवली. मटण बनवण्यास नकार देऊन आईने शिवीगाळ केल्याचे वडिलांनीच सांगितले होते, तर यापूर्वीही अनेकदा दोघांमध्ये भांडणो झाल्याचेही तिने  सांगितले. 
वैद्यकीय पुरावा, प्रत्यक्षदर्शी मुलीची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण मानून न्यायालयाने आरोपी मधुकर याला जन्मठेप आणि 5क्क् रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील हेमलता देशमुख यांनी सीमासह अनेक साक्षी-पुरावे न्यायालयापुढे सादर केले. (प्रतिनिधी)

Web Title: Life imprisonment for killing wife for murder:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.