कोकण तापणार...! काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता

By सचिन लुंगसे | Published: March 25, 2024 06:28 PM2024-03-25T18:28:06+5:302024-03-25T18:28:27+5:30

आता मुंबईत आर्द्रता ४५ टक्के नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी आहे.

Konkan will heat up...! Hot and humid conditions are likely to prevail in some areas | कोकण तापणार...! काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता

कोकण तापणार...! काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता

मुंबई : मार्च महिन्याचा उत्तरार्ध तापू लागला असून, मुंबईसह लगतच्या बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३५ अंशावर जाऊन ठेपले आहे. ठाणे, नवी मुंबईही ३६ ते ३८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, आता यात भर म्हणून पुढील दोन दिवस कोकण आणखी तापणार आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात २ ते ३ अंशानी वाढ होईल. २६ ते २७ मार्च दरम्यान कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर राज्यात हवामान कोरडे राहील. आता मुंबईत आर्द्रता ४५ टक्के नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईची आर्द्रता ७५ टक्क्यांची आसपास नोंदविण्यात येईल. यावेळी तापमान ३४ असले तरी ३८ जाणवेल. यास कारणीभूत आर्द्रता असेल. एप्रिल आणि मे महिन्यात घाम येण्याचे प्रमाण अधिक असेल.

सोमवारी नोंदविण्यात आलेले कमाल तापमान
बारामती ३८
नांदेड ३९.४
पुणे ३८.९
नाशिक ३७.७
परभणी ४०
कोल्हापूर ३७.७
सांगली ३८.७
सोलापूर ४०
छत्रपती संभाजी नगर ३८.२
मुंबई ३३.६
सातारा ३८.४

रविवारी नोंदविण्यात आलेले कमाल तापमान
छत्रपती संभाजी नगर ३७.८
जळगाव ३९.३
कोल्हापूर ३७.५
मालेगाव ४०.८
मुंबई ३२.५
नांदेड ३९.२
नाशिक ३६.८
धाराशीव ३८.८
परभणी ३९.९
सांगली ३८.४
सातारा ३८.५
सोलापूर ४०

Web Title: Konkan will heat up...! Hot and humid conditions are likely to prevail in some areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.