...तर बेळगावचा प्रश्न ठोकशाहीने सोडवू- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 16:45 IST2018-03-30T16:42:23+5:302018-03-30T16:45:25+5:30

न्यायालय सीमाभागाबाबत कधी निर्णय घेईल, तो घेवो. मात्र, तोपर्यंत बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा.

If Belgaum is not solved through lokshahi Democracy we should opt for thokshahi violence Sanjay Raut | ...तर बेळगावचा प्रश्न ठोकशाहीने सोडवू- संजय राऊत

...तर बेळगावचा प्रश्न ठोकशाहीने सोडवू- संजय राऊत

नवी दिल्ली: बेळगावचा प्रश्न लोकशाहीच्या मार्गाने सुटत नसेल तर, आम्ही ठोकशाहीच्या मार्गाने हा प्रश्न सोडवू, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग आहे. दोन्ही भागांचा इतिहास आणि संस्कृती एकसारखीच आहे. न्यायालय सीमाभागाबाबत कधी निर्णय घेईल, तो घेवो. मात्र, तोपर्यंत बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, असे राऊत यांनी म्हटले. 

याशिवाय, शिवसेना नेत्यांना बेळगावमध्ये मज्जाव करण्यावरूनही त्यांनी खडे बोल सुनावले. आम्ही बेळगावात जाण्याची परवानगी मागितली तर त्याकडे जणूकाही पाकिस्तानात जायची परवानगी मागत आहोत, अशा दृष्टीने बघितले जाते. बेळगाव आणि अन्य सीमावर्ती भागातील लोकांवर जेव्हा अन्याय होईल तेव्हा त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटलेले पाहायला मिळतील. काश्मीर, कावेरी, सतलज आणि बेळगावचा विषय लोकशाही मार्गाने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने प्रश्न सोडवू अशी आक्रमक भाषा राऊत यांनी केली.





 

Web Title: If Belgaum is not solved through lokshahi Democracy we should opt for thokshahi violence Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.