हिंदू धर्म संकुचित, कर्मठ; ऋषिमुनींनी वेदात जे सांगितले, ते प्रत्यक्षात घडले नाही - सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 12:20 PM2022-11-22T12:20:56+5:302022-11-22T12:21:40+5:30

सबनीस म्हणाले, हिंदू-बौद्ध धर्मात मातंग ऋषींचे महत्त्वाचे योगदान आहे. मातंग हा शब्द जातिवाचक नाही. रामायणातील हनुमान तसेच वानरेही मातंग कुळातील होती.

Hinduism is narrow, What the sages said in the Vedas did not actually happen says Sabnis | हिंदू धर्म संकुचित, कर्मठ; ऋषिमुनींनी वेदात जे सांगितले, ते प्रत्यक्षात घडले नाही - सबनीस

हिंदू धर्म संकुचित, कर्मठ; ऋषिमुनींनी वेदात जे सांगितले, ते प्रत्यक्षात घडले नाही - सबनीस

googlenewsNext

पिंपरी (जि. पुणे) :हिंदू धर्म संकुचित, कर्मठ आहे. ऋषिमुनी यांनी वेदात जे सांगितले आहे, ते प्रत्यक्षात घडले नाही. पशू आणि मानव एकच असल्याचे सांगणारा धर्म माणसांमाणसात फरक करतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. काळेवाडी येथे मातंग ऋषी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सबनीस बोलत होते. 

याप्रसंगी बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये, माजी मंत्री दिलीप कांबळे, उद्योजक पीयूष गोयल, अभिनेता संदीप पाठक आदी उपस्थित होते.  सबनीस म्हणाले, हिंदू-बौद्ध धर्मात मातंग ऋषींचे महत्त्वाचे योगदान आहे. मातंग हा शब्द जातिवाचक नाही. रामायणातील हनुमान तसेच वानरेही मातंग कुळातील होती. सगळ्या जातीय, भारतीय-जागतिक मानदंड एक करणारे अण्णा भाऊ साठे हे एकमेव आहेत. संताला जात धर्म नसते. 


 

Web Title: Hinduism is narrow, What the sages said in the Vedas did not actually happen says Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.