मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत अतिरिक्त पुरवणी न देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 02:41 PM2017-12-15T14:41:43+5:302017-12-15T14:42:00+5:30

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत अतिरिक्त पुरवणी न देण्याच्या निर्णयाविरोधात शासकीय विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

High court adjourned the decision not to provide additional supplement to the University of Mumbai's examination | मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत अतिरिक्त पुरवणी न देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत अतिरिक्त पुरवणी न देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती

Next

मुंबई- मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत अतिरिक्त पुरवणी न देण्याच्या निर्णयाविरोधात शासकीय विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर विद्यापीठाने आज स्पष्टीकरण सादर केले आहे. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देत विद्यापीठाला नवा निर्णय जारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्ती मानसी भूषण या विद्यार्थिनीने सांगितले. उद्यापासून विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होत आहेत. तरी प्रशासनाने तत्काळ सर्व महाविद्यालयांना परीक्षेदरम्यान उत्तरपत्रिकेसह पुरवणी देण्याचे आदेश जारी करण्याची मागणी याचिकाकर्ती मानसी भूषण हिने केली आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

Web Title: High court adjourned the decision not to provide additional supplement to the University of Mumbai's examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.