इलेक्ट्रिक पोलवरील डीपीला भीषण आग

By admin | Published: May 3, 2016 10:47 PM2016-05-03T22:47:18+5:302016-05-03T22:47:18+5:30

निमवाडी चौकातील इलेक्ट्रिक पोलवरील डीपीला भीषण आग लागून ती पूर्णत: जळून खाक झाल्याची घटना आज रात्री 10:15 च्या सुमारास घडली

A heavy fire on a DP of electric poles | इलेक्ट्रिक पोलवरील डीपीला भीषण आग

इलेक्ट्रिक पोलवरील डीपीला भीषण आग

Next

ऑनलाइन लोकमत

मलकापूर, दि. 3 - शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या निमवाडी चौकातील इलेक्ट्रिक पोलवरील डीपीला भीषण आग लागून ती पूर्णत: जळून खाक झाल्याची घटना आज रात्री 10:15 च्या सुमारास घडली आहे. 
निमवाडी चौकातील इलेक्ट्रिक डिपीतून अचानक ठिणग्या पडून काही क्षणातच फटाके फुटण्यासारखा जोरदार आवाज होऊन डिपीने अचानक पेट घेतला. दरम्यान आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पाहता पाहता डिपीतून आगीचे लोळ उठत होते. घटनेची माहिती कळताच वीज वितरण कंपनीची चमु, न.प.चे अग्निशमन पथक व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
आग विझविण्याचा प्रयत्न सुरू झाला असून, आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीत इलेक्ट्रिक डिपी पूर्णत: जळून खाक झाली. सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: A heavy fire on a DP of electric poles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.