बोला, काय विचारू?... राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून घेतला मोदींच्या मुलाखतीचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 09:42 AM2019-01-03T09:42:09+5:302019-01-03T09:57:37+5:30

नववर्षाच्या सुरुवातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रसारित झालेल्या मुलाखतीचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून समाचार घेतला आहे.

A Heart to heart interview! Raj Thackeray attack on Modi's interview with cartoon | बोला, काय विचारू?... राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून घेतला मोदींच्या मुलाखतीचा समाचार

बोला, काय विचारू?... राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून घेतला मोदींच्या मुलाखतीचा समाचार

ठळक मुद्देनववर्षाच्या सुरुवातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रसारित झालेल्या मुलाखतीचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून समाचारराज ठाकरेनी केले 'एक मनमोकळी मुलाखत!' या मथळ्याखाली मोदींचे व्यंगचित्र प्रकाशित नरेंद्र मोदी हे स्वत:च स्वत:ची मुलाखत घेत आहेत, असे या व्यंगचित्रात दर्शवले आहे.

मुंबई - नववर्षाच्या सुरुवातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रसारित झालेल्या मुलाखतीचा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून समाचार घेतला आहे. गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरे यांनी मोदींच्या मुलाखतीतील 'मी'पणा आणि एककेंद्रिततेचा खरपूस समाचार घेतला आहे.

 एक मनमोकळी मुलाखत!  या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी हे स्वत:च स्वत:ची मुलाखत घेत आहेत. तसेच बोला काय विचारू? अशी विचारणा करत आहेत, असे दर्शवले आहे. आजूबाजूला मोदींचे परदेश दौरे, सरदार पटेल यांचा पुतळा, चीनमधील ड्रमवादन असे मोदीमय वातावरण चित्रित केले आहे. त्यातून मोदींचा मीपणा दर्शवला आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवर्षाच्या सुरुवातीला मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी राफेल विमान करार, पाच राज्यातील निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव, शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राइक यांसह विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली होती. 

Web Title: A Heart to heart interview! Raj Thackeray attack on Modi's interview with cartoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.