‘वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार देणा-यांपासून हिंदूंच्याही मनात असुरक्षिततेची भावना', सामनातून हमीद अन्सारींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 08:15 AM2017-08-12T08:15:18+5:302017-08-12T12:25:28+5:30

देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे असं वक्तव्य करत आपला उपरराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपवणा-या हमीद अन्सारी यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून सडेतोड टीका केली आहे

Harmeet Ansari challenges Hindus' feelings of insecurity among those who refuse to say 'Vande Mataram' | ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार देणा-यांपासून हिंदूंच्याही मनात असुरक्षिततेची भावना', सामनातून हमीद अन्सारींना टोला

‘वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार देणा-यांपासून हिंदूंच्याही मनात असुरक्षिततेची भावना', सामनातून हमीद अन्सारींना टोला

Next
ठळक मुद्दे'एक दशक उपराष्ट्रपतीपद भोगल्यावर अन्सारी शेवटच्या दिवशी ‘जाता जाता’ हे सर्व बोलतात ही वेदना नसून सत्ता सुटल्याची व्यथा''मुसलमान संकटात आहे ही त्यांची भावना होती तर उपराष्ट्रपतीपदाचा त्याग करून त्यांनी याआधीच ही भावना व्यक्त करायला हवी होती''अशा वक्तव्यांमुळे या देशातील मुसलमानांची जास्त पीछेहाट होते व त्यांच्या मागासलेपणात भर पडते'

मुंबई, दि. 12 - देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे असं वक्तव्य करत आपला उपरराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपवणा-या हमीद अन्सारी यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून सडेतोड टीका केली आहे. एक दशक उपराष्ट्रपतीपद भोगल्यावर अन्सारी शेवटच्या दिवशी ‘जाता जाता’ हे सर्व बोलतात ही वेदना नसून सत्ता सुटल्याची व्यथा आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे बंधू ब्रिगेडियर उस्मान अन्सारी हे पाकबरोबरच्या युद्धात १९४८ साली शहीद झाले आहेत. म्हणूनच हमीद अन्सारी यांच्याकडून मुसलमान व देशाला वेगळय़ा अपेक्षा होत्या. मुसलमान संकटात आहे ही त्यांची भावना होती तर उपराष्ट्रपतीपदाचा त्याग करून त्यांनी याआधीच ही भावना व्यक्त करायला हवी होती. अशा वक्तव्यांमुळे या देशातील मुसलमानांची जास्त पीछेहाट होते व त्यांच्या मागासलेपणात भर पडते. मात्र हे ‘सत्य’ अन्सारींसारख्या ज्येष्ठ मुस्लिम नेत्यांना कळूनही वळत नाही हीच येथील मुस्लिम समाजाची खरी शोकांतिका आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

पंतप्रधान मोदी हे अधूनमधून ‘मन की बात’ सांगत असतात. त्यापासून प्रेरणा घेत बहुधा (मावळते) उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीदेखील ‘मन की बात’ मांडलेली दिसते. उपराष्ट्रपतीपदाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितले की, देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. अन्सारी हे गेले दशकभर देशाचे उपराष्ट्रपती होते व अत्यंत संयमी, ज्ञानी, राजकीय जाणकार म्हणून त्यांची ख्याती होती. ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी अशी प्रतिमा त्यांनी शेवटपर्यंत जपली असताना शेवटच्या दिवशी त्यांच्या अंतरात्म्याचा असा स्फोट व्हावा याचे आश्चर्य वाटते असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

मुसलमानांना भडकवून व त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करून राजकीय मतलब आतापर्यंत साधला गेला, पण हे सर्व नव्या राजवटीत बंद झाल्याने अनेकांच्या हिरव्या लुंग्या फाटल्या आहेत. हमीद अन्सारी यांनी मुसलमानांच्या मनातील असुरक्षिततेची भावना व्यक्त केली, पण त्याच मुसलमानांच्या मनातील धर्मांध भावना व अराष्ट्रीय अंधश्रद्धेवरही प्रहार करायला हवा होता. मुसलमानांतील मोठा वर्ग ‘वंदे मातरम्’ म्हणायला तयार नाही. हा राष्ट्रगीत व मातृभूमीचा अपमान आहे. ‘‘देश सोडू, पण ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही’’ असे फूत्कार सोडणाऱया मुसलमान नेत्यांना हमीद अन्सारी यांनी फटकारले असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढली असती असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. 

गोरक्षणाच्या निमित्ताने मुसलमानांवर होणारे हल्ले जितके भयंकर तितकेच भयंकर ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार देणे आहे. ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार देणाऱयांपासून हिंदूंच्याही मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशा राष्ट्रघातकी प्रवृत्तीपासून देशाला धोका आहे ही जनभावना आहे. खरे म्हणजे मुसलमानांनी त्यांच्या जबाबदारीचे भान ठेवले तर त्यांना या देशात कसलेच भय बाळगण्याचे कारण नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. 

संपूर्ण जगात मुस्लिम सर्वात जास्त सुरक्षित असतील तर ते फक्त हिंदुस्थानात. बाजूच्या पाकिस्तानात इस्लामी राजवट असूनही मुसलमानांच्या जीवनाचा ‘नरक’ बनला आहे. इराक, बांगलादेश, अफगाणिस्तान, सीरियातील मुसलमान जनता अन्नपाण्यास मोताद बनली आहे. अमेरिकेतून मुसलमानांना घालवून देण्याची भाषा तेथील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. युरोपातील अनेक राष्ट्रे मुसलमानांना नजरेसमोर धरायला तयार नाहीत. मुसलमान व दहशतवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

हिंदुस्थानातील प्रत्येक दहशतवादी घटनेमध्ये पाकडय़ांचा हात असला तरी त्या भयंकर स्फोटांना वाती लावण्याचे काम येथील माथेफिरू मुसलमानांनी केले. हे लोक मोजके असले तरी त्यामुळे संपूर्ण मुसलमान समाज बदनाम झाला व संशयाच्या फेऱयात कायमचा अडकून पडला आहे. समान नागरी कायदा, तीन तलाक हे विषय जसे देशासाठी महत्त्वाचे आहेत तसे मुसलमानांच्या सामाजिक व कौटुंबिक प्रगतीसाठीही तोलामोलाचे आहेत. मुसलमानांनी समान नागरी कायदा स्वीकारावा व ‘शरीयत’च्या गुलामी बेडय़ा झुगारून द्याव्यात असे सांगणारे हमीद अन्सारी आम्हाला हवे होते असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

Web Title: Harmeet Ansari challenges Hindus' feelings of insecurity among those who refuse to say 'Vande Mataram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.