जनता सरकारवर खुश, आगामी निवडणूकीत भाजपा १७५ जागा जिंकणार - भाजपा सर्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 12:49 PM2017-09-17T12:49:41+5:302017-09-17T12:50:10+5:30

केंद्र व राज्य सरकार लोकहिताचे काम करीत आहे. जनता सरकारवर खुश आहे. भाजपातर्फे नुकतेच राज्यात एक सर्वेक्षण करणयात आले.

Happy to the Janata government, BJP will win 175 seats - BJP survey - BJP survey | जनता सरकारवर खुश, आगामी निवडणूकीत भाजपा १७५ जागा जिंकणार - भाजपा सर्वे

जनता सरकारवर खुश, आगामी निवडणूकीत भाजपा १७५ जागा जिंकणार - भाजपा सर्वे

Next

नागपूर, दि. 17 : केंद्र व राज्य सरकार लोकहिताचे काम करीत आहे. जनता सरकारवर खुश आहे. भाजपातर्फे नुकतेच राज्यात एक सर्वेक्षण करणयात आले.  या सर्वेक्षणात भाजपाला तब्बल १७५ जगा मिळत असल्याचे समोर आले आहे, असा खुलासा करीत देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा उर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

भाजपाच्या नाागपूर शहर कार्यकारिणीची बैठक पूर्व लक्ष्नीनगरातील मैदानावर रविवारी सकाळी सुरु झाली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्घाटन केले. या वेळी शहर अध्यक्ष७ आ. सुुधाकर कोहळे, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, श्रीकांत देशपांडे, शहर महामंत्री संदीप जोशी, संदीप जाधव, भोजराज डुंबे आदी उपस्थित होते.

या वेळी बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांसमक्षापक्षातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा खुलासा करताच कार्यकर्त्यानी गडकरी- फडणवीसांचा जयघोष केला. बावनकुळे म्हणाले,  राज्यातच नव्हे  तर केंद्रातही पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार आहे. नागपुरात नितीन गडकरी यांचा विजयरथ थांबविणे कठीण आहे, असेही ते म्हणाले. भाजपा केंद्रात ३९९ जागा जिंकणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३५ हजार कोटींची कर्जमाफी केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. विरोधक शेतकºयांची दिशाभूल करू पाहत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सरकारने घेतलेले निर्णय शेतकरी व जनतेसमोर मांडण्यासाठी पुढाकार घ्यावा.  

कोर्टाच्या निर्णय जनतेला सांगा
-  डीजे वाजवू नका, महामार्गापासून दारुची दुकाने ५०० मीटररपेक्षा जास्त अंतरावर हवीत, असे काही निर्णय न्यायालयाने घेतले आहेत. नंतर न्यायालयानच त्यातून मार्ग काढले. मात्र, या निर्णयांमुळे जनतेत सरकारविषयी रोष निर्माण होतो. अशा वेळी पदाधिकारी व कार्यककर्त्यांनी पुढाकार घेऊन यात सरकारची चूक नाही हे जनतेला पटवून द्यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांचा अभिनंदन प्रस्ताव 
- कार्यकारिणीच्याा पहिल्या सत्रात आ. सुधाकर देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांंनी शेतक-यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी, घेतलेले लोकोपयोगी निर्णय, राज्यात आणलेली गुंतवणूक आदी बाबींसाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रस्ताव एकमतााने पारीत करण्यात आला. समारोप सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अभिनंदन प्रस्ताव ठेवला जाणार आहे. 

पाच बूथवर एक पालक नेमणार : कोहळे
- शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी प्रास्ताविकातून पक्षसंघटनेचा आढावा मांडला. शहरात १ हजार ७८४ बूथची बांधणी पूर्ण झाली आहेत. बूथवर मतदार याद्या पोहचविण्यात आल्या आहेत. मततदार यादीसाठी पेज प्रमुख नेमणार आहोत. पेज प्रमुखाने त्या पेजवरील मतदारांशी संपर्क सधायचा आहे. याशिवाय प्रत्येक पाच बूथसाठी एक पालक नेमला जाईल. संबंधित पाच बूथचा आढावा हा पालक घेईल व प्रभाग अध्यक्षांकडे सादर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

घरी बसू नका, संपर्क वाढवा
- शहर अध्यक्ष कोहळे यांनी जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क करणे हाच विजयाचा मूलमंत्र असल्याचे सांगितले. शहरात ६२ हजार कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. या कामांचा प्रचार- प्रसार व्हायला हवा. त्यासाठी घरात बसू नका, संपर्क वाढवा, असे आवाहन कोहळे यांनी केले.

Web Title: Happy to the Janata government, BJP will win 175 seats - BJP survey - BJP survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.