सांगलीत फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटला; फरशीखाली सापडून दहा मजुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 07:12 AM2017-10-21T07:12:16+5:302017-10-21T11:58:32+5:30

सांगलीमध्ये ट्रकच्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

Four people were killed in a truck accident in Sangli, the incident on the Tasgaon-Kavatemaha road | सांगलीत फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटला; फरशीखाली सापडून दहा मजुरांचा मृत्यू

सांगलीत फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटला; फरशीखाली सापडून दहा मजुरांचा मृत्यू

Next

सांगली- सांगलीतील माणेराजुरीजवळ फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटून अपघात झाला. या अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात ट्रकमधील 32 व्यक्तींपैकी 10 व्यक्ती जागेवरच ठार झाल्या. तर 22 जखमी आहेत. पैकी 11 जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे आणि उर्वरित 11 जखमींवर ग्रामीण रुग्णालय, तासगाव येथे उपचार सुरु आहेत. 

अपघातानंतर तासगाव, भोसे, हातनूर आणि पलूस येथील 108 क्रमांकांच्या 4 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि उपचार सुरु करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली. तसेच, लोकप्रतिनिधी व विजापूरचे जिल्हाधिकारी शिवकुमार यांना घटनेची माहिती देण्यात येऊन सिंदगी व अन्य तालुक्यातील जखमींबाबत कल्पना देण्यात आली आहे.

शनिवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात झालेला ट्रक कर्नाटकातून येत असल्याची माहिती मिळते आहे. एसटी बंद असल्याने कर्नाटकातून कराडमध्ये मजुरी करायला मजूर या ट्रकने प्रवास करत होते. त्यावेळी तासगाव- कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडीजवळ ट्रक चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाला आहे. 

उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, मिरज तहसीलदार शरद पाटील, कवठेमहांकाळ तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासह महसुल यंत्रणेला मदतकार्यासाठी तात्काळ पाठवण्यात आले आहे. तसेच, विजापूर महसुल यंत्रणेचीही एक टीम सांगलीच्या दिशेने रवाना झाली आहे. पोलीस आणि वैद्यकीय विभागास पुढील आवश्यक आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

एसटी संपामुळे सिंधगीहुन कराडकडे मजूर फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून निघाले होते. माणेराजुरी नजीक गर्द धुक्यामुळे ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती कळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले. यावेळी जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयामध्ये हलवण्यात आले तर जेसीबीच्या साहाय्याने ट्रक खाली चिरडलेले मृतदेह बाहेर काढणेचे काम सुरू आहे.

मृत व्यक्तीपैकी सहा व्यक्तींची ओळख पटली असून त्यापैकी दोघांची नावे संगमा सिदाप्पा भिमसे (वय 60), रा. मंगळूर, ता. सिंदगी आणि श्रीमत गुलालप्पा गौड (वय 50) रा. कनमेश्वर, त जेउरगी, ( दोन्ही जि. विजापूर) अशी आहेत. 

जखमींची नावे पुढीलप्रमाणे
इंदूबाई शामराव निंबाळकर (वय 30), रा. शहाबाद जि. गुलबर्गा, परशुराम यल्लप्पा पुजारी (वय 25), रा. तालिकोट, जि. विजापुर, बसम्मा यलाप्पा पुजारी (वय 45), रा. पेरापुर, जि. बेळगाव, रुपेश शिवाजी राठोड (वय 27), रा. मुनकोळ जि गुलबर्गा, संतोष महादेव मंजुळे रा. शहाबाद जि गुलबर्गा, अशोक रेवाप्पा बिरादार (वय 50), लक्ष्मीबाई लक्ष्मण मादार (वय 30), रा. शिंदगी जि विजापूर, लक्ष्मण प्रभू मादार (वय 40) रा शिंदगी, बेबी समिरहुसेन शेख (वय 45), रा. शहापूर जि गुलबर्गा, साहेबअण्णा महादप्पा ज्ञानमंत (वय 65) रा. अंकलबा, जि गुलबर्गा, नागाप्पा शामराव निंबाळकर (वय 8) रा. शहाबाद.
 

Web Title: Four people were killed in a truck accident in Sangli, the incident on the Tasgaon-Kavatemaha road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात