शेतकरी आत्महत्येत मराठा समाजातील शेतकरी जास्त, दोन वर्षात 26 टक्के मराठा शेतक-यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 11:19 AM2017-08-29T11:19:55+5:302017-08-29T11:33:21+5:30

एकीकडे राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्च काढल्याने मराठा समाज चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्येची आकडेवारी समोर आली असून, यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठा समाज चर्चेला आला आहे.

Farmers of Maratha community suicides in farmer suicides, 26% of farmers suicides in two years | शेतकरी आत्महत्येत मराठा समाजातील शेतकरी जास्त, दोन वर्षात 26 टक्के मराठा शेतक-यांची आत्महत्या

शेतकरी आत्महत्येत मराठा समाजातील शेतकरी जास्त, दोन वर्षात 26 टक्के मराठा शेतक-यांची आत्महत्या

googlenewsNext

मुंबई, दि. 29 - एकीकडे राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्च काढल्याने मराठा समाज चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्येची आकडेवारी समोर आली असून, यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठा समाज चर्चेला आला आहे. कारण गेल्या दोन वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी 26 टक्के शेतकरी मराठा होते अशी माहिती समोर आली आहे. एप्रिल 2014 ते मार्च 2016 दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात एकूण 3880 शेतक-यांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करणा-या शेतक-यांमधील 26 टक्के शेतकरी मराठा समाजाचे होते. एकट्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यात 53 टक्के मराठा समाजातील शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.   

पुण्यामधील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स यांनी केलेल्या रिसर्च स्टडीमधून ही माहिती समोर आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 13 जिल्ह्यांमध्ये जाऊन माहिती गोळा करण्यात आली आहे. त्याच्याआधारे ही आकडेवारी समोर आली आहे. स्वयंसेवकांनी आत्महत्याग्रस्त तीन हजार शेतकरी कुटुंबांना भेट दिली. त्यांच्याकडून माहिती गोळा करण्यात आली, आणि त्यानंतरच ही माहिती दिली गेली. 

दोन जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात मराठा समाज शेतकरी आत्महत्यांमध्ये पहिल्या स्थानावर असल्याचं निदर्शनास आलं आहे. यानंतर अनुक्रमे कुणबी (16 टक्के), दलित (10 टक्के) आणि बंजारा (9 टक्के) समाजातील शेतकरी असल्याची माहिती सरकारी अधिका-याने दिली आहे. आत्महत्या करणा-या शेतक-यांपैकी फक्त पाच टक्के शेतक-यांकडे कोणतीच जमीन नव्हती असं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. 

आत्महत्याग्रस्त कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने त्यांनी सांगितली ती म्हणजे, घरातील कमावत्या माणसाने आत्महत्या केल्यानंतर त्यांनी शेतीचं काम थांबवलं आहे. त्यामुळे घरात कोणतीही कमाई येत नाही आहे. मराठवाड्यामध्ये अशा कुटुंबांची संख्या जास्त आहे असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 

मराठवाड्यात जी समस्या मराठा समाजातील शेतक-यांना सतावत आहे, त्याच समस्यांना विदर्भात कुणबी समाज सामोरे जात आहे. आत्महत्या करणा-यांपैकी 30 टक्के शेतकरी कुणबी समाजाचे असून फक्त दोन टक्के मराठा होते.

Web Title: Farmers of Maratha community suicides in farmer suicides, 26% of farmers suicides in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.