सुरक्षेतील उणीवा दूर, यंत्रणाही सक्षम - देवेंद्र फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 06:28 AM2017-11-27T06:28:30+5:302017-11-27T06:28:41+5:30

२६/११ च्या हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने सुरक्षेसंदर्भातील उणीवा दूर केल्या आहेत. विविध यंत्रणाही आता सुसज्ज आहेत. परंतु, अशांतता माजविण्यासाठी दहशतवादीदेखील आता नवनवीन हातखंडे वापरू लागले आहेत.

  Eliminate security shortages, machinery capable - Devendra Fadnavis | सुरक्षेतील उणीवा दूर, यंत्रणाही सक्षम - देवेंद्र फडणवीस 

सुरक्षेतील उणीवा दूर, यंत्रणाही सक्षम - देवेंद्र फडणवीस 

googlenewsNext

मुंबई : २६/११ च्या हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने सुरक्षेसंदर्भातील उणीवा दूर केल्या आहेत. विविध यंत्रणाही आता सुसज्ज आहेत. परंतु, अशांतता माजविण्यासाठी दहशतवादीदेखील आता नवनवीन हातखंडे वापरू लागले आहेत. गोळीबारापासून गर्दीच्या ठिकाणी भरधाव गाडी घुसविण्याचेही तंत्र आता वापरले जात आहे. त्यामुळे दहशतवादाविरोधातील लढ्यात आता जनसामान्यांचा सहभाग आवश्यक बनल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.
२६/११ च्या हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंद्रेश कुमार, लेफटनंट जनरल विश्वंभर सिंह, राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचच्या रेश्मा जैन व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, २६/११चा दहशतवादी हल्ला हा देशाच्या आर्थिक केंद्रस्थानावर केलेला हल्ला होता. या हल्ल्यानंतर राज्यात ‘एनएसजी’च्या धर्तीवर फोर्सवनची स्थापना करण्यात आली. समुद्री सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांकडे आता सर्वात आधुनिक कंट्रोल रूम आहे. अशी व्यवस्था २६/११ लाअसती तर जवान आणि अधिकाºयांना आपला जीव गमवावा लागला नसता, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
तर, देशांतर्गत व सीमेवरील सुरक्षासंदर्भात उल्लेखनीय कार्य होत
असून नक्षली कारवाईचे प्रमाण वीस टक्क्यांनी कमी झाल्याचे गृहराज्यमंत्री अहीर यांनी सांगितले. सर्वोत्कृष्ट नवीन बनावटीची उपकरणं, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी दिला जाईल. त्यात कमतरता पडू देणार नसल्याचे अहिर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title:   Eliminate security shortages, machinery capable - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.