सरकारशी चर्चेस नकार; अण्णा बसले उपोषणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 06:29 AM2019-01-31T06:29:12+5:302019-01-31T06:29:24+5:30

प्रस्तावासह आलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन माघारी

Discussing talks with the government; Anna sat on fast | सरकारशी चर्चेस नकार; अण्णा बसले उपोषणाला

सरकारशी चर्चेस नकार; अण्णा बसले उपोषणाला

Next

पारनेर/राळेगणसिद्धी (जि.अहमदनगर) : सरकारचा चर्चेचा प्रस्ताव धूडकावून लावून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. त्यामुळे प्रस्तावासह आलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन माघारी परतले.

केंद्रात लोकपाल व राज्यात लोकायुक्त यांची त्वरित नेमणूक, शेतीमालाला हमीभाव व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी या हजारे यांच्या मागण्या आहेत. ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद करून अण्णांना पाठिंबा दिला. अण्णांशी चर्चा करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीत येणार होते़ मात्र, राज्य सरकारच्या हातात काहीच नसल्याचे सांगत, महाजन वा राज्य सरकारच्या प्रतिनिधीबरोबर चर्चा करण्यास अण्णांनी नकार दिला.

...तर काहीच मागणार नाही
लोकपाल व लोकायुक्तसाठी सरकारने साडेचार वर्षे चालढकल केली. शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत, पण सरकारला दु:ख कळत नाही़ शेतकऱ्यांची व्यथा मांडताना अण्णांचे अश्रू अनावर झाले होते़ संपूर्ण कर्जमाफी द्या, स्वामिनाथन आयोग लागू करा, नंतर आम्ही काहीच मागणार नाही, असे अण्णा म्हणाले.

Web Title: Discussing talks with the government; Anna sat on fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.