ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षांवर आणणार- दिलीप कांबळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 04:02 PM2018-03-28T16:02:57+5:302018-03-28T16:02:57+5:30

राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांकरिता आर्थिक फसवणूक व निर्घृण हत्या होत असल्याचे दिसून येणे तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या वयोमर्यादेबाबत आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. लीप कांबळेंनी उत्तर दिलं आहे.

Dilip Kamble will bring senior citizens 65 to 60 years of age | ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षांवर आणणार- दिलीप कांबळे

ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षांवर आणणार- दिलीप कांबळे

Next

मुंबई- राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांकरिता आर्थिक फसवणूक व निर्घृण हत्या होत असल्याचे दिसून येणे तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या वयोमर्यादेबाबत आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. दिलीप कांबळेंनी उत्तर दिलं आहे.
या लक्षवेधीवर बोलताना आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रश्न विचारला की, महत्त्वाचा धोरणात्मक प्रश्न म्हणजे ज्येष्ठांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर कधी आणणार?, गो-हेंच्या या प्रश्नावर दिलीप कांबळेंनी उत्तर दिलं आहे. पुढील अधिवेशनाच्या आत वयोमर्यादा ६५ वरून ६० वर आणण्याचा निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. मातोश्री वृद्धाश्रम योजना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद लाभलेली योजना होती. हे अनुदान लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, आ.डॉ.गोऱ्हे यांनी सुचविल्याप्रमाणे कोल्हापुरात क्रॉनिक दीर्घकालीन आजारी ज्येष्ठ नागरिकांसाठी 'सावली' संस्था उभारण्यात आली आहे. त्या धर्तीवर सामाजिक संस्थांना विश्वासात घेऊन विस्मरण, अल्झमायर यांसारख्या रुग्णांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक 'मॉडेल' संस्था उभारण्यात येईल. या प्रश्नावर बैठक घेतली जाईलच. परंतु ज्येष्ठ नागरिकांच्या निधनानंतर नातेवाईकांना दूरच्या  देशातून पोहोचण्यास जो वेळ लागतो तोपर्यंत ज्या व्यवस्था लागतात त्यासाठीही योग्य त्या सुविधा करण्यास योग्य त्या सूचना देण्यात येतील, याबाबत डॉ. गोऱ्हे यांच्या अपेक्षेनुसार लवकरच बैठकही घेण्यात येईल.

डॉ. आ. नीलम गोऱ्हे यांचं सभागृहात केलं अभिनंदन
या सभागृहाला अभिमान वाटेल अशी गोष्टी घडलेली आहे. आपल्या सभागृहाच्या सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक महिला आयोगाच्या ६२ व्या सत्रात आर्थिक सामाजिक परिषदेच्या संस्था सदस्य प्रतिनिधी या नात्याने सहभागी झाल्या होत्या. त्यांनी स्त्री आधार केंद्राच्या समांतर परिसंवादात "नैसर्गिक आपत्तीच्या पूर्वतयारीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग" यावर त्यांनी अध्यक्ष म्हणून विचार मांडले. हे आपल्या महाराष्ट्र राज्याला व सभागृहाला भूषणावह आहे. आपण सभागृहाने त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. मी सन्माननीय सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. 

Web Title: Dilip Kamble will bring senior citizens 65 to 60 years of age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.