Devendra Fadnavis Udayanraje Bhosale : देवेंद्र फडणवीस हे मराठा नसूनही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढे काही केले- उदयनराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 06:31 PM2022-08-12T18:31:07+5:302022-08-12T18:31:53+5:30

उदयनराजे भोसले यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने

Devendra Fadnavis took lot of efforts for Maratha Reservation says Udayanraje Bhosale | Devendra Fadnavis Udayanraje Bhosale : देवेंद्र फडणवीस हे मराठा नसूनही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढे काही केले- उदयनराजे भोसले

Devendra Fadnavis Udayanraje Bhosale : देवेंद्र फडणवीस हे मराठा नसूनही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढे काही केले- उदयनराजे भोसले

googlenewsNext

Devendra Fadnavis Udayanraje Bhosale Maratha Reservation: राज्यात सध्या शिंदे गट विरूद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळतोय. तशातच आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि संभाजीराजे यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना उदयनराजे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली. "देवेंद्र फडणवीस हे मराठा नसूनही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढे काही केले. याउलट 'पाटील', 'महाडिक', 'शिर्के', भोसले', अशा आडनावाच्या फक्त पाट्या लावणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केले?", असा रोखठोक सवाल भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.  शुक्रवारी पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चे निघाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा निर्णय झाला, पण नंतर हे आरक्षण कायद्याच्या कचाट्यात सापडले. मग महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणाबाबतची जबाबदारी देण्यात आली होती. मराठा आरक्षणाविषयक उपसमितीचे अध्यक्ष त्यांना करण्यात आले होते. पण अडीच वर्षात त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही, अशी अप्रत्यक्षपणे खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली. "अशोकाचं झाड स्वत: वाढतं पण इतरांना सावली देत नाही", असा टोला त्यांनी लगावला.

"गेल्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाची जबाबदारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे दिली असती तर हा प्रश्न तेव्हाच मिटला असता. पण ज्यांच्याकडे मराठा आरक्षणाची धुरा होती त्यांनी काहीच केले नाही. देवेंद्र फडणवीस हे मराठा नसूनही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढे काही केले. याउलट 'पाटील', 'महाडिक', 'शिर्के', भोसले', अशा आडनावाच्या फक्त पाट्या लावणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केले?", असा सवाल त्यांनी महाविकास आघाडीला केला.

उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सविस्तरपणे भाष्य केले. "मी जातपात मानत नाही. हे जातपात करण्यापेक्षा सरसकट सर्वच जातीमधील आर्थिक दुर्बलांना आरक्षण दिले पाहिजे. आपल्याकडे पूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची व्याख्याच चुकीची केली आहे. त्याचा फटका सर्वांना बसत आहे. व्यक्ती कुठल्याही जातीमधील असू दे ना, दुर्बल घटकांना सरसकट सवलती द्या ना. तुम्ही फक्त मागासवर्गीयांनाच आरक्षण का देता?", असा सवालदेखील उदयनराजे यांनी उपस्थित केला.

 

Web Title: Devendra Fadnavis took lot of efforts for Maratha Reservation says Udayanraje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.