बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

By admin | Published: March 25, 2017 02:23 AM2017-03-25T02:23:51+5:302017-03-25T02:23:51+5:30

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने धडक दिल्याने एकाचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई फाट्याजवळ

The death of one in the bus | बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

Next

वसई : वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने धडक दिल्याने एकाचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई फाट्याजवळ गुरुवारी संध्याकाळी हा अपघात घडला. रिक्षातून उतरत असताना नवलसिंग मानासिंग (४५) यांना बसने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेची एक बस वसईच्या दिशेने येत होती. त्याचवेळी वसई फाट्याजवळ नवलसिंग रिक्षातून उतरत होते. महापालिकेच्या बसने वळण घेताना त्यांना धडक दिली. रक्तबंबाळ अवस्थेत मानासिंग रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यांना उपचारासाठी वसईच्या खासगी रुग्णालयात आणण्यात आले. शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल असून, त्याला अटक केली नसल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The death of one in the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.