मोहपा नगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता

By admin | Published: January 9, 2017 01:43 PM2017-01-09T13:43:30+5:302017-01-09T14:38:43+5:30

मोहपा पालिकेत 17 जागांपैकी 10 जागावर विजय मिळवत काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवत गड कायम राखला आहे.

The Congress's coalition government in the municipality of Mohpa | मोहपा नगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता

मोहपा नगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 9 - मोहपा पालिकेत 17 जागांपैकी 10 जागावर विजय मिळवत काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवत गड कायम राखला आहे. भाजपाने पाच जागावर विजय मिळवला आहे. नगरपालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्यासाठी काल मतदान झाले. नागपूरमधील 9 तर गोदिंयातील 3 पालिकांचा यामध्ये समावेश आहे. 
 
मोहपा नगरपालिका नगराध्यक्षपदीही काँग्रेने बाजी मारली आहे. शोभा काऊटकर या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. 
 
मोहपा येथे एकूण ५,६६७ मतदारांपैकी ८५.९६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे नऊ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले असून, नगराध्यक्ष पदासाठी सात तर नगरसेवकांच्या १७ जागांसाठी ६८ उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले.
 

Web Title: The Congress's coalition government in the municipality of Mohpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.