नगरसेवक अविनाश बागवे यांच्या अटकेवरून पुण्यात काँग्रेस- भाजपमध्ये ठिणगी !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 06:20 PM2018-09-26T18:20:07+5:302018-09-26T18:20:21+5:30

काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे यांच्या अटकेवरून पुणे शहरात भाजप आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे

conflict between Congress and Bjp at Pune | नगरसेवक अविनाश बागवे यांच्या अटकेवरून पुण्यात काँग्रेस- भाजपमध्ये ठिणगी !

नगरसेवक अविनाश बागवे यांच्या अटकेवरून पुण्यात काँग्रेस- भाजपमध्ये ठिणगी !

Next

पुणे : काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे यांच्या अटकेवरून पुणे शहरात भाजप आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मंगळवारी काँग्रेसने बागवे यांच्या अटकेमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला होता. या आरोपांचे भाजपकडून जाहीर निवेदन काढून खंडण  करण्यात आले आहे. 

            रविवारी झालेल्या  विसर्जन मिरवणुकीत अविनाश बागवे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मिळून गणेश मूर्तीची विटंबना करणे, मिरवणुकीत अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात  आला. या प्रकरणी बागवे यांना जामीन मिळाला आहे. या विषयावर मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या कारवाईमागे राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि भाजपचे नेते असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. 

             काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेल्या या सर्व आरोपांना भाजपने मात्र नाकारले आहे. या संबंधात भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी विशेष निवेदन जारी करून काँग्रेस नेते पोलीस प्रशासनावर दबाव आणत  असल्याचे म्हटले आहे. या निवेदनात काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे आणि अन्य नेत्यांनी भाजपवर केलेले आरोप हे राजकीय असून अविनाश बागवे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या गंभीर गुन्ह्यावर पांघरून घालून जनतेची दिशाभूल करणारे आहेत. पुत्रप्रेमापोटी बागवे यांनी हे आरोप केले असून, ते निराधार आहेत. पोलिसांनी त्यांच्या अधिकारात निपक्षपणे कारवाई केली असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा शब्दात काँग्रेसला फटकारले आहे. 

Web Title: conflict between Congress and Bjp at Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.