बँकेसह शैक्षणिक कामासाठी एकच ‘कॉम्बो कार्ड’, संजय पाटील यांची संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 08:13 AM2017-12-04T08:13:22+5:302017-12-04T08:15:18+5:30

Concept of a single 'combo card', 'Sanjay Patil' for educational work with bank | बँकेसह शैक्षणिक कामासाठी एकच ‘कॉम्बो कार्ड’, संजय पाटील यांची संकल्पना

बँकेसह शैक्षणिक कामासाठी एकच ‘कॉम्बो कार्ड’, संजय पाटील यांची संकल्पना

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांकडील ओळखपत्र आणि बँकेचे डेबिट कार्ड एकत्रित करण्याचा अनोखा प्रयोग पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) व स्टेट बँकेने एकत्र येऊन राबवला आहे. ‘कॉम्बो कार्ड’ची मूळ संकल्पना आहे ती नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी डॉ एस एल पाटील यांची.

- भूषण रामराजे  

नंदुरबार : विद्यार्थ्यांकडील ओळखपत्र आणि बँकेचे डेबिट कार्ड एकत्रित करण्याचा अनोखा प्रयोग पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) व स्टेट बँकेने एकत्र येऊन राबवला आहे. या ‘कॉम्बो कार्ड’ची मूळ संकल्पना आहे ती नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी डॉ एस एल पाटील यांची. शहादा तालुक्यातील भादा येथील मूळ रहिवासी असलेले प्रा डॉ संजय लिमजी पाटील हे शासकीय पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता आहेत़ इन्स्ट्रूमेंटेशन हा त्यांचा विषय.

विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत त्यांनी बँक आणि महाविद्यालय अशा दोन्ही ठिकाणी उपयोगी पडेल, असे एकच कार्ड तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता़ स्टेट बँकेने त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरत विद्यार्थ्यांना कार्ड देण्याबाबत अनुकूलता दर्शवली.
बँकेच्या व्यवहारांसाठी देण्यात येणाऱ्या या डेबिट कार्डमध्ये विद्यार्थ्यांची माहिती असलेली चीप टाकण्यात आली आहे. कार्डवर विद्यार्थ्यांचे छायाचित्र, त्याचा क्रमांक, रक्तगट आदी माहितीही देण्यात आली आहे. बँकेचे व्यवहार आणि महाविद्यालयातील शैक्षणिक कामे यासाठी आता एकाच कार्डचा वापर करता येणार आहे.

या कार्डात विद्यार्थ्यांचे नाव, क्रमांकासहित त्याची माहिती यावर आहे. तसेच ग्रंथालयात पुस्तक देवाण-घेवाणीसाठी विद्यार्थ्यांची ओळख पटावी, म्हणून या कार्डमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी चीप बसविण्यात आली आहे. ग्रंथालयात गेल्यानंतर आरएफआयडी चीप रीडरद्वारे विद्यार्थ्यांची सर्व माहिती मिळू शकेल. महाविद्यालयातील प्रयोगशाळा, तसेच दरवाजा उघडण्यासाठीही याचा उपयोग होईल, असा दावा पाटील यांनी केला आहे.

१२०० विद्यार्थ्यांना कार्डचे वाटप
४महाविद्यालय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने १२०० विद्यार्थ्यांना या कॉम्बो कार्डचे वाटप करण्यात आले आहे़ बाजारपेठेत कोठेही असलेल्या पीओएस मशीनमध्ये हे कार्ड टाकल्यास विद्यार्थ्यांना व्यवहार करता येतील.

हे कॉम्बो कार्ड आर्थिक व्यवहार आणि शैक्षणिक कामकाजासाठी वापरता येईल. यातील आरएफआयडी चीप सीओईपीची असणार आहे.
- डी.बी.बी. आहुजा, संचालक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

‘डेबिट कार्डवरच ओळखपत्र करता आले तर, हा विचार पुढे आला आणि स्टेट बँकेच्या अधिकाºयांबरोबर यासंबंधी चर्चा केली. त्यांनी महाविद्यालयाची गरज लक्षात घेऊन त्यानुसार कार्डमध्ये बदल केले आणि एकच कार्ड तयार केले आहे. त्याचा उपयोग एटीएममधून पैसे काढण्याबरोबरच कँटीनमधील बिल देण्यासाठी होणार आहे़ याशिवाय महाविद्यालयातील शैक्षणिक कामासाठीही ते उपयोग करता येईल.
- प्रा.डॉ. एस एल पाटील

Web Title: Concept of a single 'combo card', 'Sanjay Patil' for educational work with bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.