महाविद्यालयेही बाप्पामय

By admin | Published: September 2, 2014 01:40 AM2014-09-02T01:40:05+5:302014-09-02T01:40:05+5:30

कॉलेजचे फेस्टिव्हल आणि डेज सेलीब्रेट करताना स्वत:ला झोकून देणारी तरुणाई बाप्पाचाही डे दणक्यात सेलीब्रेट करीत आहे.

Colleges too | महाविद्यालयेही बाप्पामय

महाविद्यालयेही बाप्पामय

Next
मुंबई : कॉलेजचे फेस्टिव्हल आणि डेज सेलीब्रेट करताना स्वत:ला झोकून देणारी तरुणाई बाप्पाचाही डे दणक्यात सेलीब्रेट करीत आहे.  गणोशोत्सवाचा उत्साह कॉलेजमध्येही दिसून येतोय. काही महाविद्यालयांचे गणोशोत्सव त्यांच्या वेगळेपणामुळे सर्वाना माहीत असतात. पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन हल्ली बहुतेक महाविद्यालये इकोफ्रेंडली गणोशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. 
महाविद्यालयात गणपती आणायचा, त्याची प्राणप्रतिष्ठा परंपरागत पद्धतीने करायची. पण हे सगळे करताना पर्यावरणाची घडी जराही विस्कटणार नाही याचीही काळजी घ्यायची. म्हणजे काय तर गणोशमूर्ती ही शाडूच्या मातीची किंवा कागदाच्या लगद्यापासून तयार करायची. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती किंवा थर्माकोलचा वापर देखावा किंवा आरासमध्ये करायचा नाही, हे बहुतेक सर्व महाविद्यालयांनी ठरवले आहे. 
पोद्दार कॉलेजच्या आजी-माजी विद्याथ्र्यानी गेली 73 वर्षे दीड दिवस बाप्पाच्या सेवेची परंपरा जपली आहे. यंदाही टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंनी सजावट करीत विद्याथ्र्याना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या महाविद्यालयातील बाप्पाच्या सेवेत विद्याथ्र्यासहित प्रोफेसर आणि शिक्षकेतर कर्मचा:यांचाही मोठा पाठिंबा मिळतो.
रुईया महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुलांचा गणपती नेहमीच जरा हटके असतो. या विद्याथ्र्यानी शाडूच्या मातीपासून मूर्ती कशी बनवायची याची कार्यशाळा भरवली होती. दोन वर्षापूर्वी या मुलांनी पेपर मॅश (रद्दी पेपरचा लगदा) पासून गणपतीची मूर्ती बनवली होती आणि त्याची प्रतिष्ठापना केली होती. त्यानंतर ती मूर्ती त्यांनी विसर्जित न करता सांभाळून ठेवली. दरवर्षीप्रमाणो तसेच करण्यात येणार आहे.
गेली चार दशके उत्सवाचा वसा जपणा:या रुपारेल महाविद्यालयात यंदा ‘मल्हार’रुपी गणपती बसविला आहे. या विद्याथ्र्यानी गणोश विसर्जनानंतर समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. विसर्जनानंतर किना:यांवर होणारा कचरा कमी कसा करता येईल, यासाठी जनजागृती मोहीम त्यांनी राबवली आहे. परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयातील विद्याथ्र्यानीही हीच मोहीम हाती घेतली आहे. विद्याथ्र्याचा उत्साह आणि त्यामुळे प्राचार्याचा मिळालेला पाठिंबा यामुळे यंदा या महाविद्यालयातही पर्यावरणस्नेही गणोशमूर्ती स्थापन होणार आहे. 
एसआयडब्लूएस महाविद्यालयातही सात वर्षे थाटामाटात गणोशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही अंबरनाथ येथील निसर्गाचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलाय. उत्सव काळात रात्रंदिवस या ठिकाणी बाप्पाच्या सेवेत महाविद्यालय मग्न असते.
 
इकोफ्रेंडली बाप्पा 
पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन हल्ली बहुतेक महाविद्यालये इकोफ्रेंडली गणोशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. काही महाविद्यालयांत असा इकोफ्रेंडली गणोशोत्सव साजरा होत आहे.
 

 

Web Title: Colleges too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.