यवतमध्ये ढगफुटी?

By admin | Published: August 23, 2014 11:53 PM2014-08-23T23:53:37+5:302014-08-23T23:53:37+5:30

यवतमध्ये आज सायंकाळी ढगफूटी सदृश्य पाऊस होऊन ओढ्याला प्रचंड मोठा पुर आला. पुराचे पाणी सोसायटय़ांमधील तळमजल्यात घुसले.

A cloud in the yuvat? | यवतमध्ये ढगफुटी?

यवतमध्ये ढगफुटी?

Next
यवत :  यवतमध्ये आज सायंकाळी ढगफूटी सदृश्य पाऊस होऊन ओढ्याला प्रचंड मोठा पुर आला.  पुराचे पाणी सोसायटय़ांमधील तळमजल्यात घुसले. श्री. काळभैरवनाथ मंदिर पाण्याखाली गेले होते. पुणो-सोलापूर महामार्गावरील वाहतूकदेखील ठप्प झाली. ओढय़ाच्या काठावरील टप:या वाहून गेल्या. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. 
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाऊसाला सुरुवात झाली. यवत गावाच्या इतिहासात आजचा पाऊस सर्वाधिक मोठा होता. गावातील ओढ्याला तर महापुरच आला. गावातील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ मंदिर पूर्णपणो पाण्यात गेले होते .मंदिरातील मूर्ती पाण्यात आध्र्या पर्यंत पाण्यात गेल्या होत्या.तर ओढ्याच्या बाजूला झालेल्या अतिक्रमण मधील टप?्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या . पुणो सोलापुर महामार्गावर देखिल पुराचे पाणी आल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. गावातील ओढ्याला आलेला पुर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत होते.मात्न सदर पुरात मोठी वित्त हाणी झाली.आनंद ग्राम , भुलेश्वर मार्केट , गांधी हॉस्पिटल , महालक्ष्मी नगर आदि परिसरातील इमारतींच्या तळ मजल्यान मध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची घबराट झाली.उशीरा पर्यंत कसलीही जीवीत हाणी झाल्याची माहिती मिळाली नव्हती मात्न पुरात घरांमध्ये पाणी गेलेल्या ठिकाणी मदत करण्यासाठी काही नागरिक सरसावले होते. श्री काळ भैरवनाथ मंदिरात घुसलेले पाणी बाहेर काढण्यासाठी गावातील ग्रामस्थ ज़मा झाले होते. यावेळी भीमा पाटस कारखान्याचे संचालक सुरेश शेळके, सरपंच शाम शेंडगे,  काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष नानासाहेब दोरगे,  बबन सोनबा दोरगे, रोहिदास गायकवाड,  बाळासो चव्हाण, दत्ताेबा दोरग, सतीश दोरगे, गणोश दोरगे, समीर दोरगे, दादा काटम व सर्व मानकरी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.  (वार्ताहर)
 
4अचानक आलेल्या पुरात ओढ्यातील पत्र्याच्या टपरीसह एक युवक देखिल वाहून चालला होता .परंतु टपरी वाहून गेली सुदैवाने युवक मात्न बचावला.
4यवतच्या इतिहासातील सर्वात मोठा पुर 
4ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात घुसले पाणी 
4आनंदग्राम सोसायटीचा तळमजल्यात पाणी
4संपूर्ण तळ मजला पाण्यात मोठी वित्त हाणी होण्याची शक्यता 
4 गांधी हॉस्पिटल मध्ये देखिल घुसले पाणी 
 
चाकणला मुसळधार पावसाने झोडपले
चाकण : चाकण परिसरात आज सायंकाळी वळवाच्या मुसळधार पावासाने चाकण करांना अक्षरश : झोडपून काढले . वातावरणात  दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता . सायंकाळी 7 वाजता धो धो पावूस सुरु  झाला अन सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले . पुणो - नासिक महामार्गावरून पावसाचे पाणी वाहत होते. येथील कोहिनूर सेंटर मधील तळघरातील आवारात पाणी घुसले होते,त्यामुळे दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली . दिवसभर उघडीप दिलेल्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली . 
 
4शिरूर व जुन्नर तालुक्यातील काही भाग तसेच पुरंदर आणि इंदापूर तालुक्यातील काही प्रदेशावर मात्र पावसाची अवकृपा कायम आहे. याठिकाणी दिवसभर कडाक्याचे उनं असते. अंगातून घामाच्या धारा वाहतात. दुपारनंतर आकाशात ढग जमतात मात्र पाऊसच पडत नाही. जोरदार वा:याने ढग वाहून जातात. शेतकरी मात्र आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पुणो जिल्ह्यातील डोंगर माथ्यावरील धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्याने जिल्ह्याचा पाणीप्रश्न मात्र सुटल्यात जमा आहे.
 
मुळशीत मुसळधार; एक तासात 82 मिलीमीटरची नोंद 
पौड : मुळशीत विविध गावात संध्याकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने या हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. पिरंगुट परिसरात संध्याकाळी 5 ते 6 च्या सुमारास आकाश ढगांनी भरून आले  अचानक पावसाला सुरवात झाली. सुमारे तासभर मेघ गजर्नेसह झालेल्या पावसामुळे रस्ते, भातखाचरे जलमय झाले. 
रस्त्यावरून वहात असलेल्या पाण्यामुळे पुणो झ्र कोलाड रस्त्यावरील पौड झ्रपिरंगुट येथे  वाहतूकही विस्कळीत झाली होती. 
यावर्षीच्या हंगामात एक तासाच्या कालावधीत 82 मिलीमीटरचा विक्रमी  पाउस पडल्याचे सुयशच्या हवामान विभागाचे प्रमुख शेखर म्होकर यांनी सांगितले. या पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आला होता. गेले चार दिवस दुपारी कडाक्याचे उन पडत असून सायंकाळी 4 पासून जोरदार पावसाला सुरूवात आहे. (वार्ताहर)
 
पुण्यालाही झोडपले
पुणो :  गेल्या चार दिवसांपासून दररोज हजेरी लावणा:या पावसाने शनिवारी पुण्यात रौद्र रुप धारण केले. अवघ्या पाऊस तासांत तब्बल 26.3 मिलीमीटर पाऊस पडला. या पावसाने शहरातील रस्त्यांना ओढण्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. पाणी तुंबून राहिल्याने ड्रेनेजमधील झाकणांना न जुमानता ठिक¨ठकाणी कारंजी निर्माण झाली होती. या पावसाने दुचाकीस्वारांचे प्रचंड हाल झाले. 
दिवसभराच्या उकाडय़ानंतर सायंकाळी सहा वाजता शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली.  सखल भागातील दुकाने, सोसायटय़ा व काही घरांत देखील पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. शहरातील रस्ते जलमय झाल्याने कामावरुन घरी पतरणा:या चाकरमान्यांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत होती. दरम्यान, पुढील चोवीस तासांत शहरात मेघ गजर्नेसह पाऊस कोसळेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.  पुण्यात सलग चौथ्या दिवशी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. विविध कार्यालये सुटण्याच्या वेळेस झालेल्या जोरदार पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली होती. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला.गणोश पेठ मच्छी मार्केटमध्ये ओढय़ाचे पाणी शिरल्याने मार्केट मधील क्रेट वाहून गेले. 

 

Web Title: A cloud in the yuvat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.