मुख्यमंत्र्यांच्या सचिवाचे ‘बेकायदा’ काम न केल्याने आकसाने बदली ?

By admin | Published: August 30, 2015 02:18 AM2015-08-30T02:18:29+5:302015-08-30T02:18:29+5:30

मनमाड येथील पोलीस परेड ग्राऊंडभोवती कुंपण भिंत बांधून ते बंद न करता शेजारी असलेल्या छत्रे हायस्कूलला त्या मैदानाचा पूर्वीप्रमाणेच वापर करू द्यावा, हे मुख्यमंत्र्यांचे सचिव

Chief minister's secretariat changed in order not to work 'illegal'? | मुख्यमंत्र्यांच्या सचिवाचे ‘बेकायदा’ काम न केल्याने आकसाने बदली ?

मुख्यमंत्र्यांच्या सचिवाचे ‘बेकायदा’ काम न केल्याने आकसाने बदली ?

Next

मुंबई : मनमाड येथील पोलीस परेड ग्राऊंडभोवती कुंपण भिंत बांधून ते बंद न करता शेजारी असलेल्या छत्रे हायस्कूलला त्या मैदानाचा पूर्वीप्रमाणेच वापर करू द्यावा, हे मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांचे ‘बेकायदा’ सांगणे आपण ऐकले नाही म्हणून दराडे यांनी आकसाने आपली बदली करायला लावली, असा गंभीर आरोप मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र वासुदेव मेघराजानी यांनी केला आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारीत औरंगाबादहून मनमाडला आलेल्या मेघराजानी यांची २१ आॅगस्ट रोजी वाशिमला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. जुलैमध्ये गडचिरोलीहून रायगड जिल्ह्यात पेण येथे नियुक्ती झालेले पण तेथे रुजू न झालेले डॉ. राहुल धर्मराज खाडे यांना मेघराजानी यांच्या जागी मनमाजला पाठविण्यात आले.
मेघराजानी यांनी या बदलीच्याविरोधात महराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिका केली आहे. त्यात त्यांनी पोलीस महासंचालक व राज्य सरकारसोबत दराडे यांनाही प्रतिवादी केले आहे. ‘मॅट’चे अध्यक्ष न्या. ए.एच. जोशी यांनी शुक्रवारी या याचिकेच्या संदर्भात मेघराजानी यांच्यातर्फे अ‍ॅड. अरविंद व भूषण बांदिवडेकर व सरकारसाठी सरकारी वकील के. बी. भिसे यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर प्रतिवादींनी ९ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र करण्याचे निर्देश दिले. १० सप्टेंबर रोजी याचिकेवर प्राथमिक स्तरावरच अंतिम सुनावणी होईल, असेही स्पष्ट केले गेले.
न्यायाधिकरणाने मेघराजानी यांच्या बदलीस स्थगिती दिली नाही. ते वाशिमला रुजू होऊ शकतात व त्यांनी तसे केले तरी याचिका मंजूर झाल्यास त्यांना अनुकूल आदेश मिळण्यात अडचण येणार नाही, असे ‘मॅट’ने नमूद केले.
बदली आदेश निघाल्यावर लगेच आपण मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांची भेट घेऊन ही बदली कशी अन्याय्य आहे ,हे त्यांना सांगितले. परंतु त्यांनी दखल घेतली नाही, म्हणून आपण याचिका केली, असे मेघराजानी यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दराडे यांच्याकडून परेड ग्राऊंडला कुंपण भिंत बांधू नका, ते छत्रे हायस्कूलला वापरू द्या, असा फोन ४ आॅगस्ट रोजी आल्यावर मेघराजानी यांनी त्याची लगेच दुसऱ्या दिवशी पोलीस डायरीत रीतसर नोंद केली. एवढेच नव्हे तर त्यांनी नाशिकचे पोलीस अधीक्षक व नाशिक परिमंडळाच्या पोलीस उपमहानिरीक्षकांना पत्र लिहूनही या बाबतीत येत असलेल्या राजकीय दबावाची माहिती त्यांना दिली. (विशेष प्रतिनिधी)

नेमके केव्हा, काय घडले?
मेघराजानी यांनी याचिकेत शपथपूर्वक कथन करून जो घटनाक्रम दिला आहे तो थोडक्यात असा-
मनमाडमध्ये १९२३ पासून दोन हेक्टर २१ आर क्षेत्रफळाचे पोलीस परेड ग्राऊंड आहे. तेथे शीघ्र कृती दलाचे कार्यालयही आहे व त्यावर रेस्ट हाऊसही बाधायचा प्रस्ताव आहे.
या परेड ग्राऊंडच्या शेजारी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे छत्रे हायस्कूल आहे. हायस्कूल, विद्यार्थी व पालक गेली अनेक वर्षे या ग्राऊंडचा वापर करीत असे.
प्रवीण दराडे याच हायस्कूलचे विद्यार्थी आहेत व त्यांचे एक चुलत बंधू मनमाडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत.
मेघराजानी यांनी मनमाडमध्ये बदलून आल्यावर २४.३४ लाख रुपये मंजूर करून घेतले व सा.बां. विभागातर्फे परेड ग्राऊंडभोवती कुंपण भिंत बांधण्याचे काम सुरु केले.
सामाजिक व राजकीय क्षेत्रातून यास विरोध झाला. याच पार्श्वभूमीवर दराडे यांनी फोेन करून ‘आजवर कोणाही डीवायएसपीची कुंपण बांधण्याची हिंमत झाली नाही’, असे ऐकविले.
सा. बा. विभागाच्या अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार नाशिकच्या भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या सांगण्यावरून काम थांबविले गेले. पण नंतर ते पुन्हा सुरु झाले.
२० फूट बाय ३८२ फूट कुंपण भिंत आपल्या जागेवर बांधली आहे, असा छत्रे हायस्कूलचा दिवाणी न्यायालयात दावा. सरकार व पोलीस विभागाकडून याचा प्रतिवाद.
याच विषयावर उच्च न्यायालयात जनहित याचिका.
दिवाणी दावा व जनहित याचिका प्रलंबित.

Web Title: Chief minister's secretariat changed in order not to work 'illegal'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.