मुख्यमंत्री विरोधकांना माथाडी नेत्यांची मदत

By admin | Published: September 16, 2014 01:21 AM2014-09-16T01:21:19+5:302014-09-16T01:21:19+5:30

मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कराड दक्षिणमधील उमेदवारीला त्यांच्याच पक्षातील आमदार विलासकाका उंडाळकरांनी आव्हान दिले आहे.

Chief Minister's opponents help Mathadi leaders | मुख्यमंत्री विरोधकांना माथाडी नेत्यांची मदत

मुख्यमंत्री विरोधकांना माथाडी नेत्यांची मदत

Next
नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कराड दक्षिणमधील उमेदवारीला त्यांच्याच पक्षातील आमदार विलासकाका उंडाळकरांनी आव्हान दिले आहे. त्यांना माथाडी नेत्यांनी मदतीचा हात पुढे केला असून, नवी मुंबईतील मेळावा यशस्वी करण्यातही माथाडी नेत्यांची मोलाची भूमिका बजावली. 
निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर अद्याप कोणत्याच पक्षाचे जागावाटप जाहीर झालेले नाही. कोण कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढविणार हेही स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु काँग्रेसचे विलासकाका पाटील उंडाळकर मागील 35 वर्षापासून या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मुख्यमंत्र्यांना पक्षाने तिकीट दिले तरी त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी त्यांनी नवी मुंबईमधील माथाडी भवनमध्ये मतदार संघातील मुंबईतील रहिवाशांचा मेळावा आयोजित केला होता. कोणत्याही स्थितीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. 
नवी मुंबईमधील विलासकाका उंडाळकर यांच्या मेळाव्यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधले ते कामगार नेते व राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील व नगरसेवक संपत शेवाळे यांनी. मेळाव्याचे आयोजन व तो यशस्वी करण्यासाठी शेवाळे यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनाच उमेदवारी मिळावी व त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले.  नरेंद्र पाटील यांनीही त्यांच्या भाषणात  काकांच्या आतार्पयतच्या कामाचे कौतुक केले. आम्ही एकाच भागातील आहोत. आमचा त्यांना पाठिंबा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे कराड दक्षिणमध्ये उमेदवारीसाठी मुख्यमंत्री चव्हाण यांचे नाव आघाडीवर असताना त्यांच्याविरोधात बंडखोरीची भाषा करणा:या विलासकाकांना माथाडींचे नेते  उघड मदत करीत आहेत. यामुळे अप्रत्यक्षपणो मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढविण्याचेच काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. ही माथाडी नेत्यांच्या माध्यमातून ही राष्ट्रवादीचीच खेळी असल्याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत. 
 
पक्ष म्हणून नव्हे; व्यक्तिगत स्नेहातून मदत
च्माथाडी नेते व राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, विकासकाका व आम्ही एकाच भागातले आहोत. आमच्या वडिलांपासून त्यांच्याशी ऋणानुबंध आहेत. त्यांनी या भागाच्या विकासासाठी खूप काम केले असल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. तो माझा व्यक्तिगत निर्णय असून राष्ट्रवादी पक्षाशी संबंध नाही. 
च्राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत शेवाळे यांनीही आम्ही एकाच मतदारसंघातील असून आमचे पूर्वीपासून स्नेहाचे संबंध आहेत. या स्नेहामुळे आम्ही सहकार्य केले असून, यामध्ये पक्षाच्या भूमिकेचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. 

 

Web Title: Chief Minister's opponents help Mathadi leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.