मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमध्ये रुग्णालयात जाऊन फवारणीबाधित शेतक-यांची घेतली भेट, आंदोलनाच्या धसक्यामुळे मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 10:44 AM2017-10-22T10:44:14+5:302017-10-22T11:41:27+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतक-यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

Chief Minister visits Yavatmal hospital, visits to spray-affected farmers, journalists denied admission | मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमध्ये रुग्णालयात जाऊन फवारणीबाधित शेतक-यांची घेतली भेट, आंदोलनाच्या धसक्यामुळे मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात

मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमध्ये रुग्णालयात जाऊन फवारणीबाधित शेतक-यांची घेतली भेट, आंदोलनाच्या धसक्यामुळे मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात

Next

यवतमाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतक-यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. सकाळी यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री थेट वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेले. तिथे विषबाधेमुळे उपचार घेत असलेल्या 26 रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

आतापर्यंत ४७४ विषबाधितांवर वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात उपचार झाले आहेत.  शनिवारी आणखी दोन विषबाधित रुग्ण दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात प्रचंड बंदोबस्त असून, पत्रकारांनाही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश दिला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता कक्षासह वॉर्ड क्र.१८ व १९ मध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली. 

कोणते औषध फवारले होते, उपचार कसे सुरू आहे, अशी विचारपूस करीत रुग्णांना दिलासा दिला. यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. तिथे फवारणी विषबाधा प्रकरणावर अधिका-यांसोबत बैठक सुरू आहे. बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार डॉ.अशोक उईके उपस्थित आहेत. फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे शेतक-यांचे मृत्यू झाले आहेत. 

फवारणीबाधित मृत्यूप्रकरणावरून जिल्ह्यात झालेल्या आंदोलनाचा धसका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौ-यात प्रचंड बंदोबस्त आहे. कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना संतप्त शेतक-यांचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या दौ-याची प्रचंड गोपनीयता ठेवण्यात आली होती. वैद्यकीय महाविद्यालय परिसराला छावणीचे स्वरूप आहे. संभाव्य आंदोलनकर्ते शेतकरी नेते नजरकैदेत. पत्रकारांवरही नजर ठेवण्याची पोलिसांना सूचना. यवतमाळ येथे मुख्यमंत्र्यांना यांना काळे झेंडे दाखवताना युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांना अटक करण्यात आली. 

Web Title: Chief Minister visits Yavatmal hospital, visits to spray-affected farmers, journalists denied admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी