स्वीडनच्या पंतप्रधानांशी मुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा, महाराष्ट्राला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 03:23 AM2017-10-13T03:23:37+5:302017-10-13T03:24:01+5:30

स्मार्ट सिटीच्या विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञान, घनकचरा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात आपला देश महाराष्ट्राला निश्चितपणे मदत करेल, अशी ग्वाही स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीत दिली.

 Chief Minister Fadnavis talks with Swedish Prime Minister, helping hands of Maharashtra | स्वीडनच्या पंतप्रधानांशी मुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा, महाराष्ट्राला मदतीचा हात

स्वीडनच्या पंतप्रधानांशी मुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा, महाराष्ट्राला मदतीचा हात

Next

विशेष प्रतिनिधी 
मुंबई : स्मार्ट सिटीच्या विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञान, घनकचरा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात आपला देश महाराष्ट्राला निश्चितपणे मदत करेल, अशी ग्वाही स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीत दिली.
लॉफवेन-मुख्यमंत्री भेटीवेळी केंद्रीय मंत्री वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी स्टॉकहोममध्ये विविध उद्योगसमूह तसेच मान्यवरांशी संवाद साधला. भारत आणि स्वीडन बिझनेस लीडर्स राउंड टेबल या परिषदेत मुख्यमंत्र्यांचे भाषण झाले. स्कॅनिया समुहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मॅथियास कार्लबूम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नागपूरमध्ये कार्यरत या समुहाने राज्यातील इतर शहरांमध्ये वाहतुकीसाठी बायोगॅस सुविधा क्षेत्रात कामाची तयारी दर्शविली.
उड्डाण आणि संरक्षण क्षेत्रातील सॅब उद्योग समुहाने या क्षेत्रातील सुविधांसोबतच तंत्रज्ञानही महाराष्ट्रात आणण्याची तयारी दाखवली आहे.
पुण्यातील प्रकल्प विस्तारण्याचा एसकेएफचा निर्णय
बेअरिंग आणि सील उत्पादन क्षेत्रातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या एसकेएफचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅलरिक डॅनियल्सन यांनी आज फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. पुण्यात या समुहाचा निर्मिती प्रकल्प असून त्यांनी महाराष्ट्रात आणखी विस्तार करण्याचे ठरविले आहे. आराखडा लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.

Web Title:  Chief Minister Fadnavis talks with Swedish Prime Minister, helping hands of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.