ऑनलाइन लोकमत 

चंद्रपूर, दि. 21 - लातूर पाठोपाठ विदर्भात चंद्रपूरमध्येही भाजपाचे कमळ फुलणार आहे. 66 सदस्यांच्या चंद्रपूर महापालिकेतही भाजपाने सर्वाधिक 31 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यातून येतात. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली होती. सुधीर मुनगंटीवर यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या या निवडणुकीत काँग्रेकडून सत्ता खेचून आणण्यात भाजपाला यश आले.  
 
चंद्रपुरात भाजपाने सर्वाधिक 31 जागा जिंकल्या. त्याखालोखाल काँग्रेसला 15, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले. चंद्रपूरमध्ये 66 जागांसाठी 460 उमेदवार रिंगणात होते. 19 एप्रिलला चंद्रपूर महापालिकेसाठी 50 टक्के मतदान झाले. उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली होती. 
 
2012 महापालिका निवडणुकी चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 26 जागा जिंकून काँग्रेसने सत्ता मिळवली होती. त्यावेळी भाजपाला 18 आणि शिवसेनेला 6 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला 4, मायावतींच्या बसपाला 2 आणि मनसेला 1 जागा मिळाली होती.