रिमा लागू यांच्या करियरमध्ये मैंने प्यार किया ठरला टर्निंग पॉईंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 11:17 AM2017-05-18T11:17:20+5:302017-05-18T12:21:13+5:30

आपल्या दमदार अभिनयाने रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा गाजवणा-या अभिनेत्री रिमा लागू यांच्या अकाली एक्झिटने मराठीच नाही हिंदी चित्रपटसृष्टीलाही धक्का बसला आहे.

In the career of Rima Aap, I decided to love the turning point | रिमा लागू यांच्या करियरमध्ये मैंने प्यार किया ठरला टर्निंग पॉईंट

रिमा लागू यांच्या करियरमध्ये मैंने प्यार किया ठरला टर्निंग पॉईंट

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत/सीएनएक्स एक्सक्लुझिव्ह 
मुंबई, दि. 18 - आपल्या दमदार अभिनयाने रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा गाजवणा-या अभिनेत्री रिमा लागू यांच्या अकाली एक्झिटने मराठीच नाही हिंदी चित्रपटसृष्टीलाही धक्का बसला आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी सहाय्क अभिनेत्री म्हणून अनेक रोल्स केले. पण त्यांना प्रेमळ आईच्या भूमिकेने वेगळी ओळख मिळवून दिली. मराठीच्या बरोबरीने हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये भक्कम पाय रोऊन उभे राहणा-या मोजक्या अभिनेत्रींमध्ये त्यांचा समावेश होतो. 
 
राजश्री पोडक्शनच्या मैंने प्यार किया चित्रपटात त्यांनी रंगवलेली सलमानच्या आईची भूमिका यांच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण या रोलनंतर त्यांना आईच्या भमिकेच्या अनेक ऑफर्स आल्या आणि आपल्या अभिनयाच्या बळावर त्यांनी त्या सर्व भूमिका यशस्वीपणे साकारल्या. 
 
रिमा लागू ऐंशी-नव्वदच्या दशकात मराठी सिनेसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्री असताना त्यांना राजश्रीच्या मैंने प्यार कियामध्ये रोलची ऑफर मिळाली. मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यावेळी फार पैसा नव्हता. कलाकार मागेल तितके पैसा मिळेल असे ते दिवस नव्हते. सर्व काही निर्मात्याच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून होते. पण त्यावेळी हिंदीमध्ये बराच पैसा होता. कलाकाराच्या मागणीनुसार तिथे पैसा दिला जायचा. 
 
राजश्रीकडून जेव्हा रिमा लागू यांना  चित्रपटात काम करायला तुम्ही किती पैसे घेणार असे विचारण्यात आले. त्यावेळी रिमा लागू यांना चांगलेच टेन्शन आले होते. कारण मराठी इंडस्ट्रीमध्ये अशी विचारणाच होत नसे. चित्रपटाच्या निर्मात्यांकडून त्यांनी एक दिवस मागितला. संपूर्ण दिवस पैसे किती मागायचे याचाच त्या विचार करत होत्या. 
 
त्यांनी रात्रभर या गोष्टीचा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी निर्मात्यांची भेट घेऊन मला केवळ 21 हजार द्या असे त्यांना सांगितले. त्यांच्यासाठी ही खूपच कमी रक्कम होती. हिंदी इंडस्ट्रीत किती पैसे दिले जातात हे रिमा यांना माहीत नाही याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी या चित्रपटासाठी स्वतःहून रिमा लागू यांना या रक्कमेपेक्षा कित्येक पटीने अधिक रक्कम दिली. 
 

Web Title: In the career of Rima Aap, I decided to love the turning point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.