जेजे हॉस्पिटलमध्ये पार पडलं ब्रेनडेड रुग्णाचं अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 08:58 AM2017-07-24T08:58:29+5:302017-07-24T08:58:29+5:30

मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये रविवारी पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्णाच्या नातेवाईकांच्या संमतीने प्रत्यारोपणासाठी अवयवदान करण्यात आलं.

Brained Patients Contained in JJ Hospital | जेजे हॉस्पिटलमध्ये पार पडलं ब्रेनडेड रुग्णाचं अवयवदान

जेजे हॉस्पिटलमध्ये पार पडलं ब्रेनडेड रुग्णाचं अवयवदान

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24- सरकारी हॉस्पिटलमध्ये रूग्णांची संख्या ही नेहमी जास्त असते. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला वाचवणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तेथिल डॉक्टर काम करत असतात. बऱ्याचदा रूग्णांचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळत नाही. असं असतानाही विविध मुद्द्यावर प्रबोधन करण्याचं काम हे डॉक्टरांकडून केलं जातं. यामधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अवयवदान करणं. हॉस्पिटल्समध्ये अनेक रुग्ण हे ब्रेनडेड अवस्थेमध्ये असूनही त्यांचं अवयवदान करायला नातेवाईक तयार नसतात. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येत नाही. पण मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये रविवारी पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्णाच्या नातेवाईकांच्या संमतीने प्रत्यारोपणासाठी अवयवदान करण्यात आलं. जळगावातील राजेश महाजन यांनी आपली पत्नी संगीता हिचं अवयवदान केलं. राजेश हे १० वर्षांचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. पण पत्नी गेल्यावरही अवयवदानाच्या रुपाने तिच्या स्मृती कायम राहाव्यात हा विचार करून महाजन यांनी प्रत्यारोपणासाठी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
आणखी वाचा
 

बाळासाहेबांचा यथोचित सन्मान करू - मुख्यमंत्री

सिद्धिविनायक ट्रस्ट अध्यक्षपदी आदेश बांदेकर यांची नियुक्ती

एसटीला थेट मिळणार तिकीट सवलतीची रक्कम

जळगावमध्ये राहणाऱ्या संगीता महाजन यांना १७ जुलै रोजी एका मोटरसायकलने धडक दिली होती. त्या अपघातानंतर डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केलं होतं. यावेळी महाजन कुटुंबांकडून अवयवदानासाठी होकार मिळवणं जेजेतील डॉक्टरांच्या समोर आव्हान होतं. पण तेथिल डॉक्टरांच्या टीमने हे आव्हान पूर्ण केलं. महाजन कुटुंबीयांनी संगीता यांचं यकृत आणि डोळे प्रत्यारोपणासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. 

 
जेजे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांनी जेजेच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसंच जेजेसाठी हे मोठं यश असल्याचं ते म्हणाले आहे. रूग्णांमध्ये तसंच त्यांच्या कुटुंबियांमध्ये अवयवदानाबद्दलची जनजागृती नसल्याने सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेल्यांना अवयवदानासाठी प्रेरीत करणं कठीण असतं. जेजे हॉस्पिटलमध्ये 70 टक्के रूग्ण हे ग्रामीण महाराष्ट्रातून येतात त्यामुळे जनजागृती करणं कठीण असतं, असं तात्याराव लहाने म्हणाले आहेत. 
 
महाजन कुटुंब रूग्णाच्या अवयवदानाची परवानगी देणार शहराती 33वं कुटुंब ठरलं आहे. संगीता महाजन यांना गुरूवारी भायखळातील जेजे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. दूचाकीने धडक दिल्याने संगीता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारानंतरही संगीता यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यानंतर जेजे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना अवयव दानाविषयी सांगितलं. पण संगीत या व्हेंटिलेटरवर असल्याने त्यांचा जीव वाचेल, असं महाजन कुटुंबीयांना वाटलं होतं, अशी माहिती तात्याराव लहाने यांनी दिली आहे. 
 
संगीता महाजन या ब्रेनडेड झाल्याचं प्रमाणपत्र रविवारी देण्यात आलं. त्यानंतर अवयवदानासाठी यकृत काढण्याची शस्त्रक्रिया हॉस्पिटलमधील प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. गौरव चौबळ यांनी केली. सोलापुरातील बार्शीत राहणाऱ्या एका 56 वर्षीय व्यक्तीला संगीता यांचं यकृत प्रत्यारोपण करण्यात आलं. 
 

Web Title: Brained Patients Contained in JJ Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.