भाजपाच्या सत्ताकाळात २.१७ कोटींना पीकविमा, काँग्रेसच्या आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 06:47 AM2018-11-06T06:47:46+5:302018-11-06T06:48:06+5:30

काँग्रेसच्या सत्ताकाळात १३ वर्षांत ९५ लाख शेतकऱ्यांना तर भाजप सत्ताकाळात केवळ चार वर्षांत २.१७ कोटी शेतकºयांना पीक विम्यापोटी भरीव आर्थिक मदत दिली, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या आरोपांना प्रदेश भाजपाने सोमवारी दिले.

BJP's ruling for over 2.17 crore peakimaima, and BJP's reply to Congress's allegations | भाजपाच्या सत्ताकाळात २.१७ कोटींना पीकविमा, काँग्रेसच्या आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तर

भाजपाच्या सत्ताकाळात २.१७ कोटींना पीकविमा, काँग्रेसच्या आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तर

Next

मुंबई  - काँग्रेसच्या सत्ताकाळात १३ वर्षांत ९५ लाख शेतकऱ्यांना तर भाजप सत्ताकाळात केवळ चार वर्षांत २.१७ कोटी शेतकºयांना पीक विम्यापोटी भरीव आर्थिक मदत दिली, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या आरोपांना प्रदेश भाजपाने सोमवारी दिले.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, २०१६-१७ मध्ये ४०१० कोटी रुपये इतका विमा हप्ता दिला गेला. शेतकºयांना१९१९ कोटी रुपये मिळाले, असा दावा त्यांनी केला असला तरी प्रत्यक्षात त्या रकमेत २२ हजार कोटींचे पीक संरक्षित करण्यात आले होते, हे त्यांनी सांगितलेले नाही.
या एका वर्षाचा आकडा देताना त्याच्या आधीच्या दोन वर्र्षांचे आकडे त्यांनी हेतूपुरस्सर सांगितलेले नाहीत. २०१४ मध्ये १७९४ कोटी रुपये विमा हप्ता होता, पण, नुकसान भरपाई १८०७ कोटी रुपये मिळाली. २०१५ मध्ये ५१०८ कोटी विमा हप्ता दिला, त्याच्या बदल्यात ५१०० कोटी रुपये नुकसानभरपाई शेतकºयांना मिळाली.
प्रधानमंत्री विमा योजनेमुळे शेतकºयांनी १६९४ कोटी रुपये भरले. त्यांना ११४७० कोटी रुपये प्राप्त झाले. विरोधकांना आरोप करण्याचा अधिकारच नाही. त्यांच्या पाच वर्षांत वर्षांत सरासरी ५१२ कोटी रुपये शेतकºयांना मिळाले, तर भाजपाच्या चार वर्षाच्या कार्यकाळात वर्षाकाठी सरासरी २९९० कोटी रुपये मिळाले याकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले आहे.
 

Web Title: BJP's ruling for over 2.17 crore peakimaima, and BJP's reply to Congress's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.