'महाराष्ट्रात 1 हजार कोटींची दलाली होते, तेव्हा हे नेते गप्प बसतात'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 06:23 PM2021-10-26T18:23:12+5:302021-10-26T18:23:44+5:30

'महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रकरणांवरुन लक्ष दुसरीकडे हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत'

BJP leader Devendra Fadnavis criticizes state government over nawab malik and sameer wankhede case | 'महाराष्ट्रात 1 हजार कोटींची दलाली होते, तेव्हा हे नेते गप्प बसतात'

'महाराष्ट्रात 1 हजार कोटींची दलाली होते, तेव्हा हे नेते गप्प बसतात'

googlenewsNext

मुंबई: गोवा क्रुझ पार्टी आणि राज्यातील ड्रग्स छापेमारी प्रकरणावरुन नवाब मलिक(Nawab Malik) आणि एनसीबी(NCB) अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणे असे गंभीर आरोप केले आहेत. त्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं आहे.

1 हजार कोटींच्या दलालीवर हे नेते गप्प
माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणतात, हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्यामुळे मी फार काही बोलणार नाही. पण अधिकारी आणि साक्षीदारांना टार्गेट करणे योग्य नाही. अशा प्रकारच्या प्रकरणातून फक्त प्रसिद्धी मिळते. महाराष्ट्रात 1 हजार कोटींची दलाली होते त्यावर हे नेते गप्प बसतात. गृहमंत्री फरार आहेत त्यावर हे गप्प आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची इतकी प्रकरणे सुरू आहेत, त्यावरून लक्ष दुसरीकडे हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली. 

हे खरोखर महावसुली सरकार आहे
फडणवीस पुढे म्हणतात, एनसीबी ड्रग्स प्रकरणात कारवाई करतं, याचा वापर राजकीय दबाब आणण्यासाठी का होईल? मग असं म्हणायचं का, सगळ्या ड्रग्जवाल्यांसाठी तुम्ही बॅटिंग करत आहात ? मुळात त्यांचं दुःख आहे की, सतत पडणाऱ्या छाप्यामुळे खरोखर महावसुली सरकार आहे असा एक संदेश लोकांमध्ये जात आहे आणि त्यावर लोकांचा विश्वास बसतोय, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.

...तर कुठलाच खटला टिकणार नाही
सरकारवर दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात आणायचे, हे जे सुरू आहे ते बरोबर नाही. साक्षीदारांची विश्वासार्हता न्यायालयाबाहेर समाप्त करण्याची पद्धत सुरु झाली तर कुठलाच खटला टिकणार नाही. पण एक गोष्ट निश्चित की या प्रकरणात काही आरोप निश्चित झालेत. एनसीबीतील वरिष्ठांनी त्या आरोपांची चौकशी केली पाहिजे. पण त्याच वेळी तपास अधिकाऱ्यांना धमकावणे आणि त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावरुन आरोप करणे अत्यंत दुर्दैवी आहे. वानखेडे यांनी आपल्या प्रमाणपत्राबाबत खुलासा केलाय, त्यामुळे विशिष्ट हेतूने आरोप करणं योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.

Web Title: BJP leader Devendra Fadnavis criticizes state government over nawab malik and sameer wankhede case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.