खामगावात दोन तोंडी बालकाचा जन्म

By admin | Published: August 23, 2014 10:12 PM2014-08-23T22:12:10+5:302014-08-24T00:33:46+5:30

बाळाला चार डोळे, दोन ओठ

The birth of two oral baby in Khamgaon | खामगावात दोन तोंडी बालकाचा जन्म

खामगावात दोन तोंडी बालकाचा जन्म

Next

खामगाव : येथील सामान्य रूग्णालयात एका ३५ वर्षीय महिलेने दोन तोंड, ४ डोळे, २ ओठ अशा शारीरिक व्यंग असलेल्या बाळाला २२ ऑगस्ट रोजी जन्म दिला आहे.
खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आज शेगाव तालुक्यातील एका ३५ वर्षीय महिला प्रसुतीसाठी आली. रात्री आठ वाजेच्या सुमारास या महिलेने एका विचीत्र बालकाला जन्म दिला. हे पुरुष जातीचे बालक असून त्याला चार डोळे, दोन तोंड, दोन ओठ, दोन कान आहेत. बाळाची टाळू दुभंगलेली असून ओठही दुभंगलेले आहेत. जन्मताच बाळाचे वजन ३.२ किलोग्रॅम आहे. बाळाच्या तोंडाचा भाग वगळता मानेपासून खालील अवयव माणसारखे आहेत. दोन्ही हात, पोट, छाती, लिंग, पाय यामध्ये मात्र कसलाही दोष नाही. या महिलेची प्रसुती नॉर्मल झाली असून आईची प्रकृती ठिक आहे. या ३५ वर्षी महिलेच्या प्रसुतीची ही तिसरी वेळ आहे. या अगोदर तिला दोन मुली आहेत. गेल्या दोन दिवसापासून हे बाळ नवजात शिशु अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. अशा प्रकारचे बाळ चार-पाच दिवस जिवंत राहत असल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे.

** सोनोग्राफी न करणे भोवले
स्त्रीला गर्भधारणेपासून तर प्रसुतीपर्यंत ३ ते ४ वेळा सोनाग्राफी करणे गरजेचे आहे. सोनोग्राफीमुळे बाळाची तब्येत त्याच्या हालचाली वगैरे आढळून आल्यानंतर बाळ कमजोर असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केला जातो. मात्र सदर महिलेने वेळीच सोनोग्राफी न केल्याने या बाळाविषयी पुरेशी माहिती मिळू शकली नाही.

** ..तर गर्भपात करता येतो
गर्भधारणेपासून सुरुवातीला १८ आठवडे पूर्ण झाल्यानंतर सोनोग्राफी करणे गरजेचे आहे. यावेळी सोनोग्राफी केल्यानंतर जन्मजात असलेल्या बाळामध्ये काही व्यंग आढळल्यास तसेच या व्यंगामुळे ते जिवंत राहत नसल्यास २0 आठवड्यापर्यंत कायदयाने त्या मातेचा गर्भपात करता येतो त्यामुळे जन्मजात दोष निदानाकरिता सोनाग्राफी महत्त्वाची ठरते.

** रुग्णालयात जन्माला आलेले दोन तोंडाचे बालक हे सध्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. एक लाख बाळामध्ये अशा प्रकारचे बाळ जन्माला येत असल्याची आरोग्य विभागाची माहिती आहे. बाळाच्या आईची प्रकृती मात्र ठिक आहे.

Web Title: The birth of two oral baby in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.