सौरकृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांना आता भरावे लागणार कमी पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 01:09 AM2019-02-16T01:09:53+5:302019-02-16T01:10:03+5:30

शेतकऱ्यांना दिवसा सौरऊर्जेसाठी वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौरकृषीपंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांना भरावी लागणारी रक्कम कमी करण्यात आली आहे.

 Beneficiaries of the solar park scheme will have to pay less money | सौरकृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांना आता भरावे लागणार कमी पैसे

सौरकृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांना आता भरावे लागणार कमी पैसे

Next

मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा सौरऊर्जेसाठी वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौरकृषीपंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांना भरावी लागणारी रक्कम कमी करण्यात आली आहे. ‘महावितरण आपल्या दारी’ या अंतर्गत ज्या शेतकºयांनी विजेची जोडणी घेतली आहे तेदेखील या योजनेत आॅनलाईन अर्ज करत सहभागी होऊ शकतील.
राज्यभरातील ६४ हजार ९३८ शेतक-यांचे अर्ज मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १७ हजार ०१६ शेतकºयांना कोटेशन दिले आहे. ज्यांना केबलद्वारे वीजपुवठा दिला होता त्यांना सौर कृषिपंप योजनेत आॅनलाईन अर्ज करून सहभागी करून घेण्याचा निर्णय महावितरणने घेतला. दरम्यान, सौर कृषिपंप योजनेसाठी ५३३ शेतकºयांनी पैसे भरले असून त्यांना वीजजोडणी देण्यात येईल.

Web Title:  Beneficiaries of the solar park scheme will have to pay less money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.